• Home
  • मुखेड तालुक्यातील विना तक्रारदार शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मंजूर करा बालाजी पाटील ढोसणे यांची मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी ..

मुखेड तालुक्यातील विना तक्रारदार शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मंजूर करा बालाजी पाटील ढोसणे यांची मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी ..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201125-WA0038.jpg

मुखेड तालुक्यातील विना तक्रारदार शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मंजूर करा बालाजी पाटील ढोसणे यांची मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी ..

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांचे पिक वाहुन गेले तर शेतकऱ्याच्या उभ्या पिकाले मोड आले होते. या नुकसानीची दखल शासनाने दखल घेण्यासाठी शेतकरी पुत्रानी शासनाला धारेवर धरले होते.आणि तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता.यामुळे मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानिचे अनुदान मिळाले आहे.
ईफको टोकियो पिक विमा कंपनीकडे तालुक्यातील १ लाख १२ हजार ९५० शेतकऱ्यांनी मुग,उडीद,सोयाबीन,या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम भरली होती.त्यापैकी केवळ १३ हजार १९९ आँनलाईन/फोनलाईन तक्रारदार शेतकऱ्यांना विमा रक्कम जमा करण्यात आली आहे. परंतु तालुक्यातील उर्वरित ९९ हजार ७५१ शेतकऱ्यांना नुकसान होऊनही फोनवरून तक्रार केली नाही म्हणून आडमुठी धोरण लावून विमा रक्कम जमा करण्यात आली नाही.
विमा कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे तालुक्यातील म्हणजेच शेतकऱ्यांना विमा रकमेपासून वंचित राहव लागले आहे.
तालुक्यात सलग ७२ तास विज पुरवठा खंडित आसल्यामुळे आनेकाचे फोन बंदच होते तर तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतातील पिकाच्या नुकसानीची सावरासावर करण्याच्या कामात व्यस्त होते व आनेक शेतकऱ्याकडे मोबाईल फोन नाहीत तर काही शेतकऱ्यांना फोन लावता पण येत नाही.कंपनिने दिलेला टोल फ्री नंबर हा वारंवार व्यस्त राहत होता दोन-दोन तास फोन लावण्याचा प्रयत्न करूनही फोन लागु शकत नव्हते.त्यामुळे तालुक्यातील ९५% च्या वर शेतकरी विमा मंजुरी पासुन वंचित आहेत.वरिल सर्व बाबीचा सहानुभूतीने विचार करून प्रशासनाने तालुक्यातील सर्व महसुल मंडळाच्या बाधीत क्षेत्रात ओला दुष्काळ म्हणून जाहीर केलेल्या सर्व महसुल मंडळात ओला दुष्काळ जाहिर झाला आहे.पण विमा का लागु झाला नाही असा सवालही शेतकरी वर्गातुन होते आहे या कंपनिने शेतकऱ्यांना कसलिच पुर्व सुचना न केल्यामुळे आमच्या तालुक्यातील ९९ हजार ७५१ शेतकरी पिक विमा अनुदानापासुन वंचित राहत आहेत.यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवात सरकार विरोधात व विमा कंपनीच्या विरोधात तिव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. महसूल मंडळातील अतिवृष्टी नुकसानीचे सरकारी पंचनामे ग्राह्य धरून तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा मंजुरी करण्यासाठी आपल्याला स्तरावरुन तात्काळ आदेशीत करावे करावे अन्यथा तालुक्यातील ९९ हजार ७५१ बाधित शेतकरी बांधवाच्या कुटुंबियासह मंत्र्यालासमोर उद्रेक मोर्चा काढण्यात येईल अशा इशाऱ्याचे निवेदन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,महाराष्ट्राचे कर्षी मंत्री दादाभाऊ भुसे यांच्याकडे शेतकरी संघर्ष समिती कार्यकर्ते शेतकरी पुत्र बालाजी पाटील ढोसणे,बालाजी पाटील सांगविकर, रमाकांत पाटील जाहुरकर, यांनी निवेदनाद्वारे सरकारकडे केली आहे.

पिक विमा कंपन्यांची मनमानी थांबवावी ढोसणे
पिक विमा कंपन्यांची मनमानी कारभार तत्काळ थांबवा व प्रत्येक तालुक्याला पिक विमा कंपनी चे ऑफिस उभारून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शेतकरी बांधव तक्रार कुठे करावी हा मोठा प्रश्न ग्रामीण भागात निर्माण झाला आहे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे ढोसणे यांनी म्हटले

anews Banner

Leave A Comment