Home अमरावती आगामी काळात निवडणुकाच होणार नाही; ‘अंनिस’च्या श्याम मानव यांचे भाकीत सामाजिक मूल्यांचा...

आगामी काळात निवडणुकाच होणार नाही; ‘अंनिस’च्या श्याम मानव यांचे भाकीत सामाजिक मूल्यांचा ह्रास होत आहे.

74
0

आशाताई बच्छाव

IMG_20231203_205519.jpg

आगामी काळात निवडणुकाच होणार नाही; ‘अंनिस’च्या श्याम मानव यांचे भाकीत सामाजिक मूल्यांचा ह्रास होत आहे.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या सामाजिक मूल्यांचा ह्रास होत आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्यांच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे संविधान जपणे आणि देशातील लोकशाही टिकण्याची गरज मध्ये जर भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत आली, तर यापुढे देशात पुन्हा निवडणुकात होणार नसल्याचे भाकीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी शनिवारी पत्रकार परिषद व्यक्त केले. निर्भय बनो विचार मंचातर्फे रविवारी अमरावती शहरात संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हान’या विषयावर श्याम मानव यांचे व्याख्यान होणार. त्या अनुषंगाने त्यांनी माध्यमंशी संवाद साधला ते म्हणाले मागील आठ ते दहा वर्षांमध्ये देशभरात समाजामध्ये समाजविघातक वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र सातत्याने सुरू आहे. देशातील राष्ट्रीय एकात्मतेला तळा देण्याचे काम सुरू आहे. आज सरकार विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याची प्रयत्न सुरू आहे. भारताची उन्नतीचे एकमेव माध्यम हे भारतीय संविधान आहे. परंतु, सध्या संविधान विरोधात कारवाई होत आहे. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या चारही मूल्यांचा ह्रास होत आहे. देशात अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचे काम सुरू आहे. वैज्ञानिक दृष्टीने मूल्य जपली जात नाही देशातील न्यायव्यवस्थेवर सरकारचा दबाव आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताच्या उन्नतीचे एकमेव माध्यम असलेले भारतीय संविधान वाचण्यासाठी आता एकत्र लढा देण्याची गरज आहे. अन्यथा दोन हजार वर्षांपूर्वीची चातुर्वर्ण्य व्यवस्था देशात निर्माण होईल.२०२४मध्ये जर देशात पुन्हा भाजप सत्तेत आली, तर मात्र देशात हुकूमशाही प्रस्थापित होऊन निवडणुकीचा प्रचार होणार नसल्याचे श्याम मानव म्हणाले.

Previous articleतलावात बुडुन विद्यार्थ्यांचा मृत्यू. तुमसर तालुक्यातील डोंगराला येथिल घटना.
Next articleचांदुर बाजारात 98 जनावरांना जीवनदान भाजपा बजरंग दल,पोलीसांची कारवाई       
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here