Home अमरावती मेळघाटातील मतदानाचा टक्का घसरला: अचलपूर मतदारसंघात ६१.३३/:तर बडनेरा ५०.९९/: मतदान.

मेळघाटातील मतदानाचा टक्का घसरला: अचलपूर मतदारसंघात ६१.३३/:तर बडनेरा ५०.९९/: मतदान.

36
0

Yuva maratha news

1000317886.jpg

मेळघाटातील मतदानाचा टक्का घसरला: अचलपूर मतदारसंघात ६१.३३/:तर बडनेरा ५०.९९/: मतदान.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
अमरावती लोकसभा मतदार संघासाठी आज शुक्रवार २६ एप्रिल ला मतदान पार पडले. यादरम्यान सायंकाळी पाच वाजेपर्यंत पहिल्या आठ तासात अनेक आश्चर्यकारक आणि तेवढ्याच रंजत बाबी पुढे आल्या. अमरावती जिल्ह्यातील आदिवासी-कोरकू बहुल मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा मतदानाचा बाबतीत नेहमीच आघाडीवर असतो. पण आजच्या मतदान दरम्यान मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा हे दोन्ही तालुके पहिले चार तासात माघारले होते. अपवाद वगळता काय माघाडीवर राहिला. जिल्ह्याच्या निवडणूक यंत्रणेमार्फत दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली. सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यामुळे ९ नऊ वाजता पहिली आकडेवारी घोषित करण्यात आली. त्यानुसार पहिल्या दोन तासात तिवसा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ८.४० टक्के मतदाराणी मतदान केले ४.२६टक्के मतदान मेळघाटात नोंदीवीले. गेले. यावेळी सहा विधानसभा मिळून तयार झालेल्या लोकसभा मतदारसंघाची सरासरी टक्केवारी ६.३५ एवढी होती. त्यानंतरच्या दोन तासात अर्थात ११ वाजेपर्यंत सरासरी मतदानाचा आकडा १७.३३ टक्क्यावर पोहोचला. यावेळी अचलपूर मतदार संघात सर्वाधिक २१.४६ तर मेळघाटात सर्वात कमी १२.६० टक्के मतदानाची नोंद झाली होती.१ वाजताच्या सहाव्या तासाला सरासरी मतदानाचा आकडा ३१.४१ टक्के होता. त्याचवेळी २५.८८ टक्के मतदानासह दर्यापूर विधानसभा मतदारसंघ सर्वात खाली होता. दुपारी ३ वाजता सरासरी मतदानाने ३.७७ पर्यंत मजल मारली. यावेळी ही अचल पूर्ण सर्वाधिक मतदानाचा आपला हक्क सोडला नव्हता. येथे ४९.७० टक्के मतदान झाले होते. तर तिवसा येथे सर्वात कमी३९.४६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. सायंकाळी ५ वाजता अर्थात मतदान सुरू झाल्यापासून ८ तासांनी लोकसभा मतदारसंघाचे सरासरी मतदान ५४.५० टक्के नोंदविला गेले होते. यामध्ये ६१.३३ टक्के मतदानासह अचलपूर सर्वात पुढे होते. तर सर्वात कमी ५०.९९ हा आकडा बडनेरा विधानसभा मतदार घात नोंदीला गेला होता. अशाप्रकारे विधानसभा नियो तुलना केल्यास पहिल्या आठ तासातील मतदानाची टक्केवारी ही बहुतेक मतदार संघांना हुलकावणी देणारी ठरली.

Previous article३९ बीड लोकसभा मतदारसंघात ५५ वैध उमेदवार; छाननी अंती १९ उमेदवार बाद
Next articleभोकर सबस्टेशन येथील जागृत देवस्थान हनुमाण मंदिर येथे मंदिर जिर्णोद्धार, मुर्तीप्राणप्रतिष्ठा व कलशरोहन सोहळा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here