Home युवा मराठा विशेष तेरी मेरी यारी…..महाराष्ट्राला कळली तुमची दुनियादारी…? संजय राऊत – रवी राणा यांचे...

तेरी मेरी यारी…..महाराष्ट्राला कळली तुमची दुनियादारी…? संजय राऊत – रवी राणा यांचे लडाक येथे सहभोजन,गप्पा

31
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220523-WA0013.jpg

तेरी मेरी यारी…..महाराष्ट्राला कळली तुमची दुनियादारी…? संजय राऊत – रवी राणा यांचे लडाक येथे सहभोजन,गप्पा

मुंबई ( अंकुश पवार मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

मुंबई ( अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी गदारोळ उडवून दिला होता. राणा दाम्पत्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोपही केले होते. त्यानंतर त्यांना अटकही झाली होती.
यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप केले होते. राणा यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या युसूफ लकडावाला याच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच पेटला होता.
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवणारे राणा दाम्पत्य आणि खासदार संजय राऊत सध्या लेह-लडाखच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातला एक फोटो समोर आला आहे. महाराष्ट्रातले हे कट्टर विरोधक लेह-लडाख दौऱ्यात चक्क एकत्र जेवण करताना दिसत आहे. विशेष म्हणजे संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकमेकांसोबत गप्पा मारताही दिसून आले.
संसदीय समितीच्या संरक्षण समितीचे सदस्य सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. या समितीत 30 खासदारांचा समावेश असून यात महाराष्ट्रातील तीन खासदार आहेत. खासदार संजय राऊत, खासदार प्रकाश जावडेकर आणि खासदार नवनीत राणा यांचा समावेश आहे. खासदाराला आपल्यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला सोबत घेण्याची परवानगी आहे आणि त्यामुळे नवनीत राणा यांच्यासोबत आमदार रवी राणा हे लडाख दौऱ्यावर गेले आहेत.
हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या आणि टीकेच्या फैरी झाडणारे संजय राऊत आणि राणा दाम्पत्य जेवणाच्या टेबलावर एकत्र आले. त्यांनी केवळ जेवणाचा तर आस्वाद घेतलाच शिवाय संवादही साधल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
आमदार महाराष्ट्रामध्ये आमदार रवी राणा यांनी खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातल्या वातावरण गेल्या काही दिवसात बरस थांबवलं होतं मी देखील यांना घडून आली होती परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी राऊत आणि राणा यांचे मनोमिलन झाल्याचे दिसून येत आहे कारण तिकडे महाराष्ट्रातले सगळे वाद आणि कुरवड्या विसरून राऊत आणि राहणार गप्पा मारताना आणि जेवण करताना दिसून आले आहे तर महाराष्ट्र पेटवणार यांनी तिकडे जाऊन म्हणून मिलिंद करण्याची गरज काय महाराष्ट्रात एवढे दिवस नाटक कशासाठी हाच प्रश्न जनतेला पडलेला आहे.
हे दोन्ही आमदार आणि खासदार संसदेच्या महाराष्ट्र मध्ये वारी घडून आणणारा शिवसेनेकडून राहणार दांपत्य हे अगदी मेटाकुटीला येऊन शिवसेनेवर करत होतं आणि तसंच त्याच जोमाने शिवसेना देखील राहणा यांना जेलमध्ये पाठवण्यासाठी आरोप धुडकावून लावण्यासाठी अगदी प्रयत्न करत होती या प्रश्नावर आमदार रवी राणा यांना मिडियाने प्रश्न विचारले असता दगडी दुश्मन जरी असला तरीसुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही बाजूला ठेवतो अशा काही शुल्लक शब्दात त्यांनी मीडियाला उत्तर दिले आहे परंतु असे असताना जर भारताबाहेर तुम्ही दोस्ती मैत्री करत असाल तर महाराष्ट्रात इतरांची डोकी का भरत होता जातीय राजकारण साठी तुम्ही कशाला करता हाच प्रश्न आता सर्वसामान्यांना येत्या काही काळात दिसून येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here