Home अमरावती चांदुर बाजारात 98 जनावरांना जीवनदान भाजपा बजरंग दल,पोलीसांची कारवाई       

चांदुर बाजारात 98 जनावरांना जीवनदान भाजपा बजरंग दल,पोलीसांची कारवाई       

149
0

आशाताई बच्छाव

IMG_20231203_205912.jpg

चांदुर बाजारात 98 जनावरांना जीवनदान भाजपा बजरंग दल,पोलीसांची कारवाई                        मयुर खापरे चांदुर बाजार.- दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी पोलीस स्टेशन चांदुर बाजार येथे मिळालेल्या माहितीवरून मोर्शी ते चांदूरबाजार रोड वर पोलीस स्टेशन चांदूरबाजार येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अवैधरित्या कत्तलीसाठी घेऊन जाणारे एकूण 98 गोवंश (बैल) एकूण कींमत 34,20,000 रूपये जनावरांना पकडून ताब्यात घेतले, यातील आरोपी इसम हे सोबत कोणतीही कागदपत्र न बाळगता सदरच्या जनावरांना अत्यंत क्रूरपणे एकमेकांना घट्ट बांधून विना चारा पाण्याचे, काठीने व पुरानी ने मारहाण करून घेऊन जात होते. सदर गोवंश जनावरांना क्रूरपणे बांधून, अवैधरित्या कत्तली करता घेऊन जात असलेल्या 6 इसमांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला ,आरोपी नामे आकाश संजय परतेती रा. मोर्शी यास गुन्ह्यात ताब्यात घेतले असून इतर आरोपी पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून पसार झाले .
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साळी सर ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिवलाल भगत सर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुरज बोंडे, API निखिल निर्मळ ,API प्रमोद राऊत ,PSI निलेश डाबेराव , ASI विनोद इंगळे, अमोल सानप,HC नितीन डोंगरे ,दिनेश राठोड ,दिलीप मुळे, अरविंद सरोदे, कोकचा सलामे , आशिष इंगळे , गणेश आगोळे, निकेश गाढवे, रुपेश श्रीवास, पंकज येवले, सागर चव्हाण ,गौरव पूसदकर यांनी केली आहे

Previous articleआगामी काळात निवडणुकाच होणार नाही; ‘अंनिस’च्या श्याम मानव यांचे भाकीत सामाजिक मूल्यांचा ह्रास होत आहे.
Next articleमागण्या मान्य न झाल्यास एन एच एम चा १४ला नागपुरात विधिमंडळावर मोर्चा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here