Home अमरावती मागण्या मान्य न झाल्यास एन एच एम चा १४ला नागपुरात विधिमंडळावर मोर्चा.

मागण्या मान्य न झाल्यास एन एच एम चा १४ला नागपुरात विधिमंडळावर मोर्चा.

70
0

आशाताई बच्छाव

IMG_20231203_212446.jpg

मागण्या मान्य न झाल्यास एन एच एम चा १४ला नागपुरात विधिमंडळावर मोर्चा.
—————
दैनिक युवा मराठा
पी एल देशमुख.
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती
तब्बल ३८ दिवसाच्या संघर्षानंतर राष्ट्रीय आरोग्य मीशनच्या (एन एच एम) डॉक्टर, परिचारिका, समुदाय आरोग्य अधिकारी, समुपदेशक व इतर कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या आंदोलन मागे घेतले. मात्र शासनाने आपला शब्द न पाडण्यास आगामी १४ डिसेंबरला नागपुरात विधिमंडळाच्या अधिवेशनावर मोर्चा काढण्याची घोषणा संबंधितांनी केली आहे. या गोष्टीमुळे शासन आणि एन एच एम कर्मचारी पुन्हा भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे त्याच वेळी आरोग्य खात्यात कायम नोकरीत असणार या परिचारिकांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. शासनाची झालेल्या समझतानुसार १३ दिवसाच्या आत राज्य सरकार संपर्क करत्या कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार निर्णय घेईल. तसे न झाल्यास चौदाव्या दिवशी अर्थात १४ डिसेंबरला पुन्हा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन वर नागपुरात मोर्चा काढला जाणार आहे. कंत्राटी म्हणून नियुक्ती केलेल्या सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम कायमस्वरूपी असल्यामुळे त्यांना नोकऱ्यांमध्ये कायम करा, अशी प्रमुख मागणी घेऊन गेल्या २५ ऑक्टोंबर पासून जिल्ह्यात दीड हजार वर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. दरम्यानच्या काळात ग्रामीण भागात रुग्णांची बरीच हेडसांड झाली. काही ठिकाणी ओपीडीच बंद राहिल्या. त्यामुळे शासन ही हा संप लवकर संपुष्टात यावा, यासाठी प्रयत्नशील होते. आखरी गेल्या ३० नोव्हेंबर रोजी सदर आंदोलन मागे घेण्यात आले. तत्पूर्वी आरोग्य मंत्री, या विभागाचे सचिव आणि आयुक्त यांच्याशी वेळोवेळी बोलणी झाली. या बोलणीतून पुढे आलेल्या मांडणीनुसार दोन्ही पक्षाचे एक मत झाले आणि लवकरच मागण्या मान्य करण्याचे ठरले. आंदोलनात एन एच एम के डॉक्टर ,परिचारिका ,समुदाय आरोग्य अधिकारी ,लेखा विभागाचे कर्मचारी ,आरबीएसकेचे कर्मचारी ,समुपदेशक कक्ष सेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदींनी सहभाग घेतला होता. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समय योजना कृती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा एमएचएम चे जिल्हा लेखा व्यवस्थापक अशोक कोठारी, सचिव डॉक्टर चैतन्य वरखडे, उपाध्यक्ष प्रशांत निर्मळ सह अनेक कर्मचारी वर्ग आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

Previous articleचांदुर बाजारात 98 जनावरांना जीवनदान भाजपा बजरंग दल,पोलीसांची कारवाई       
Next articleप्रा डॉ घनश्याम निखाडे यांच्या गुड मॉर्निंग ग्रुप तर्फे सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here