आशाताई बच्छाव
प्रा डॉ घनश्याम निखाडे यांच्या गुड मॉर्निंग ग्रुप तर्फे सत्कार
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) डॉ. घनश्याम निखाडे यांना आचार्य पदवी प्राप्त झाली आहे ते निमित्त साधून गुड मॉर्निंग ग्रुप साकोली तर्फे त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नरेश रामटेके होते तर प्रमुख अतिथी म्हणून सत्कारमूर्ती प्रा डॉ घनश्याम नीखाडे गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष डी ई रामटेके , दिलिप मासुरकर, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी मुख्याध्यापक विजय देवगिरकर अशोक रंगारी , डी ई रामटेके, नरेश रामटेके यांनी त्यांच्या भविष्याच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या
प्रा घनश्याम निखाडे यांनी सुद्धा आपण मोठ्या अथक परिश्रमाने आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे माझ्या या शिक्षणाचा फायदा निश्चितच समाजाला व विद्यार्थ्याला होईल असे मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे संचालन मनोहर मस्के यांनी केले तर आभार आय टी पटले यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कागदराव रंगारी ,पी एल शेलोकर डी, जी रंगारी, भगवान पटले , ताराचंद धकाते, हिरालाल पारधीकर, , डी ए मारवाडे, वामन कापगते ,विजय लांजेवार, अरुण चव्हाण, रमेश भिसेन, डॉ सुखदेवे,डी पी शहारे ,के आर चांदेवार, गजानन मोहतुरे, आत्माराम पटले ,मारुती पटले, अश्विन राऊत व इतर सर्व गुड मॉर्निंग ग्रुप चे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते






