Home बुलढाणा मोमिनाबाद येथे ढगफुटी आणि चक्रीवादळामुळे केळी व इतर पिकाचे शंभर टक्के नुकसान

मोमिनाबाद येथे ढगफुटी आणि चक्रीवादळामुळे केळी व इतर पिकाचे शंभर टक्के नुकसान

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220626-WA0049.jpg

मोमिनाबाद येथे ढगफुटी आणि चक्रीवादळामुळे केळी व इतर पिकाचे शंभर टक्के नुकसान

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर:-तालुक्यातील मोमिनाबाद रिंगणवाडी या शिवारातील शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे दिनांक 25 जून 2022 रोजी झालेल्या ढगफुटी पावसामुळे व चक्रीवादळामुळे मोमिनाबाद , रिंगणवाडी येथील शेतकऱ्यांचे केळी पिकाचे फार मोठ्या प्रमाणात संपूर्णपणे नुकसान झाले असून केळीचे पीक हे ढगफुटी व चक्रीवादळामुळे पुर्णपणे जमिनीवर लोळले आहे या अचानक झालेल्या चक्रीवादळाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानामुळे अक्षरशः त्या शेतकऱ्यांच्या पायाखाली जमीनच सरकल्यासारखे झाले आहे कारण फार मोठे कबाळ कष्ट करून रात्रंदिवस शेतमावलीत मेहनत घेऊन मोठे केलेले पीक अचानकच झालेल्या चक्रीवादळ व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास काळाने हिरावून घेतल्यासारखे झाले आहे आणि त्याच प्रमाणे काही नव्याने पेरणी केलेल्या सोयाबीन व इतर पिकाचे सुद्धा ढगफुटीमुळे जमिनीतील पेरलेले बियाणे थापटल्या गेले आहे अशाप्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे कळताच नेहमी प्रमाणेच आपल्या “कर्तव्य दक्षपणाचा” परिचय देत तलाठी कांबळे मॅडम आणि कृषी सहाय्यक मॅडम रविवार सुट्टीच्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन ढगफुटी पावसामुळे व चक्रीवादळामुळे झालेल्या पिकाची पाहणी केली मोमिनाबाद येथील शेतकरी गजानन मारोडे, निलेश जवंजाळ, अनिल जवंजाळ, सुनील बोरवार व मोमिनाबाद शिवारातील इतर शेतकरी यांचे केळी व इतर पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेल आहे तरी संबंधित अधिकारी यांनी शेतात येऊन नुकसानाची पाहणी केली आणि शिवारातील झालेल्या नुकसानाची उर्वरित पाहणीसाठी उद्या येणार असल्याचे सांगितले.

Previous articleपालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई –मुंबई अहमदाबाद महामार्गावर दमन दारूचा ट्रेलर
Next articleउमराणेत ना नफा ना तोटा तत्वावर शालेय साहित्य विक्रीचे उदघाटन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here