• Home
  • कर्तुत्ववान आमदार राजुबाबा आवळे एक सच्चा समाजसेवक

कर्तुत्ववान आमदार राजुबाबा आवळे एक सच्चा समाजसेवक

 

माणुसकी फौंडेशन
वडगांव :  रात्री नऊ-साडेनऊ ची वेळ होती.हातकणंगले रोडवरील नरंदे घाटामधून हातकणंगले तालुक्याचे आमदार राजूबाबा आवळे कामानिमित्त निघाले होते. त्याच वेळी नरंदे घाटामध्ये रात्री नऊ च्या सुमारास ७० वर्षाची एक माऊली बसलेली दिसली. रात्रीची वेळ आहे इतक्या भयानक अंधारात थांबणे म्हणजे त्या माऊलीला धोक्याचे आहे. हे लक्षात घेऊन आमदार साहेब त्या माऊली जवळ गेले. त्यांची विचारपूस केली. मानसिक संतुलन बिघडल्याने रस्ता दिसेल त्या ठिकाणी चालत ती येथे पर्यंत पोहचली होती. आमदारांनी त्या माऊलीला स्वतःच्या गाडीमध्ये बसवलं. व समाजाच्या हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माणुसकी फौंडेशनचे कोरोचीचे बंडू पाटील यांना संपर्क साधला. व घडलेली सर्व हकीगत सांगितली. तात्काळ बंडू पाटील यांनी आळते गावामध्ये माणुसकी फौंडेशनच्या सदस्यांना कळवलं व सदस्य आळते गावाच्या मार्गावर पोहचले. तो पर्यंत आमदार साहेबांची गाडी माऊलीला घेऊन आली होती. सदस्यांनी त्या माऊलीला घेऊन तिच्या कुटुंबाच्या चौकशीसाठी हातकलंगले पोलीस स्टेशन येथे पोहचले. पण तिथे कोणतीही मदत मिळाली नाही. पुढे इचलकरंजी शिवाजीनगर ला पोहचून पोलिसांना सर्व हकिगत सांगितली त्या माऊलीच्या कुटुंबाची, गावाची पूर्ण माहीती घेऊन तिच्या कुटूंबाच्या स्वाधीन केले.
स्वतःच वयक्तिक काम सोडून, काळोख्याच्या अंधारात असलेल्या माऊलीला आपल्या धावत्या गाडीचा ब्रेक लावून तिची चौकशी करून, तिला स्वतःच्या गाडीतून नेहून, योग्य लोकांच्याकडे जबाबदारी सोपवून माऊलीला आधार देणाऱ्या आमदार राजुबाबा आवळे यांच्या निस्वार्थी समाजसेवेला सलाम.
“भारत माझा देशा आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत.”
या प्रतिज्ञेची प्रचिती आमदार साहेबांच्या मध्ये पाहायला मिळाली.
या सेवेस माणुसकी फौंडेशन कोरोची शाखेचे बंडू पाटील, दीपक तेली व आळते शाखेचे सम्मेद मजलेकर, आशपाक मुजावर, तसेच हातकलंगले व इचलकरंजी शाखेचे बाबासाहेब नंदिवले, रवि महाडिक, इम्रान शेख, स्टेफन आवळे यांचेही सहकार्य लाभले.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment