Home नाशिक भाजप लासलगाव मंडल ४६ गाव अध्यक्ष निवडीची बैठक उत्साहात संपन्न–

भाजप लासलगाव मंडल ४६ गाव अध्यक्ष निवडीची बैठक उत्साहात संपन्न–

34
0

आशाताई बच्छाव

IMG-20230817-WA0054.jpg

भाजप लासलगाव मंडल ४६ गाव अध्यक्ष निवडीची बैठक उत्साहात संपन्न–

पुढील आठवड्यात भाजप लासलगाव मंडल अध्यक्ष ठरणार…

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

भाजप लासलगाव मंडल ४६ गाव अध्यक्ष निवडीसाठी पदाधिकारी बैठक लासलगाव येथील शिव कमल मंगल कार्यालय येथे उत्साहात झाली.बैठकीसाठी नाशिक जिल्हा उत्तर अध्यक्ष शंकरराव वाघ, निरीक्षक प्रभारी म्हणून परेश शाह,किशोर कदम आदी उपस्थित होते.या बैठकीत लासलगाव भाजप मंडळ अध्यक्ष डी के नाना जगताप यांनी आपल्या मनोगतात मागील तीन वर्षात भाजपाचे नाव घराघरात पोहोचविण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
प्रभारी परेश शाह यांनी सर्वांनी पद हे दुय्यम मानून मनापासून पार्टीसाठी काम करण्यास सांगितले. नाशिक जिल्हा भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ सुवर्णाताई जगताप यांनी लासलगाव मंडल हे सर्वच गोष्टींमध्ये अव्वल ठरले असून इथून पुढेही १०० % सर्वांनी सहकार्य करावे आणि मोदीजीं चे काम घराघरात पोहचवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.किशोर कदम,कैलास सोनवणे अमृता पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.जिल्हाअध्यक्ष शंकरराव वाघ यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना संबोधित करताना पुढील येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी सज्ज राहण्यास सांगितले.कोणालाही कसलीही अडचण असल्यास माझ्यापर्यंत थेट येऊन भेटा ,कामे करत राहा.पार्टी कोठेही कमी पडणार नाही हे सांगितले.बैठकीस जेष्ठ पदाधिकारी राजाभाऊ चाफेकर,उत्तम शिंदे, किरण कुलकर्णी ,निलेश सालकाडे, काकासाहेब दरेकर ,नरहरी कापडी , वसंत गुजर ,नितीन शर्मा ,विष्णू लुटे स्मिताताई कुलकर्णी ,रुपा ताई केदारे ,रंजना ताई शिंदे ,डॉ रमेश सालगुडे ,महेश गिरी ,बापू लचके , मनीष चोपडा ,निलेश जगताप ,पियुष बंब ,लक्ष्मण खलसे ,धनंजय गांगुर्डे ,सुनिल नेवगे, गोरख सोनवणे ,भाऊसाहेब कल्याणकर हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here