Home नांदेड लोहा येथे रुग्णांच्या सेवेसाठी डॉ. पवार यांचे आरोग्यम हाॅस्पिटल व आंबेकर मेडीकल...

लोहा येथे रुग्णांच्या सेवेसाठी डॉ. पवार यांचे आरोग्यम हाॅस्पिटल व आंबेकर मेडीकल सुरू ; जेष्ठ विधितज्ञ अॅड के.एम. पवार यांच्या हस्ते उद्घाटन

80
0

आशाताई बच्छाव

IMG-20230817-WA0056.jpg

लोहा येथे रुग्णांच्या सेवेसाठी डॉ. पवार यांचे आरोग्यम हाॅस्पिटल व आंबेकर मेडीकल सुरू ; जेष्ठ विधितज्ञ अॅड के.एम. पवार यांच्या हस्ते उद्घाटन
अंबादास पाटिल पवार
लोहा / प्रतिनिधी
रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा हे ब्रिद वाक्य घेऊन सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. कल्याण पाटील पवार व सुप्रसिद्ध जनरल फिजिशयन व बालरोगतज्ज्ञ डॉ.गजानन पाटील पवार यांचे आरोग्यम हाॅस्पिटल व युवा उद्योजक नागेश गोविंदराव सावकार आंबेकर यांचे आंबेकर मेडीकल दि. १७-८-२०२३ पासुन सुरु झाले असून यांचे उद्घाटन लोहा जेष्ठ विधितज्ञ अॅड के.एम. पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा हे ब्रिद वाक्य मानुन लोहा शहरात रुग्णांच्या सेवेसाठी लोहा नगरीचे प्रथम नगराध्यक्ष कै. माणिकराव पाटील पवार यांचे नातू प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. कल्याण विनायक पाटील पवार(एमबीबीएस,डीसीसीएच) व प्रथम नगराध्यक्ष कै.माणिकराव पाटील पवार यांचे
बंधू कै. व्यंकटराव पाटील पवार यांचे नातू प्रसिद्ध फिजिशयन व बालरोगतज्ज्ञ डॉ. गजानन नामदेवराव पवार पाटील( बीए एम एस सीसीएच) यांचे आरोग्यम हाॅस्पीटल व नागेश गोविंदराव आंबेकर सावकार यांचे आंबेकर मेडीकल आंबेकर काॅम्पलेक्स मेनरोड लोहा येथे सुरू झाली असून यांचे उद्घाटन लोहा येथील जेष्ठ विधितज्ञ अॅड के.एम. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लोहा न.पा.चे उपनगराध्यक्ष दत्ता वाले, शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण, प्रा.डाॅ.के.एम. पवार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक केशवराव मुकादम, माजी नगरसेवक वसंत ( बापू) पवार, सा. बांधकामचे उपविभागीय अभियंता मोहन पाटील पवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (निवड समिती) जिल्हाध्यक्ष मोहन पाटील पवार, प्रसिद्ध व्यापारी दिनेश सावकार तेललवार, सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटील पवार, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार, छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राम पाटील पवार, पारडी येथील शालेय समितीचे अध्यक्ष डिकळे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाटील पवार, मिडिया पोलिस सोशल क्लब पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास सावळे, पत्रकार बाळासाहेब बुद्धे , यांच्या सह मोठ्या संख्येने लोहा शहर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी डॉ. गजानन पाटील पवार व मेडीकल चालक नागेश सावकार आंबेकर यांचा सत्कार वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
चौकट —
लोहा येथील डॉ. पवार यांच्या आरोग्यम हाॅस्पीटलला व आंबेकर यांच्या मेडीकलला आ. शामसुंदर शिंदे यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, युवा नेते दिपक पाटील कानवटे, शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार ,सरपंच प्र. पुंडलिकराव पाटील बोरगावकर, शेकापचे तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष नागेश पाटील हिलाल यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

Previous articleभाजप लासलगाव मंडल ४६ गाव अध्यक्ष निवडीची बैठक उत्साहात संपन्न–
Next article७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here