Home Breaking News *कौळाणे ग्रामपंचायतीचा अजब कारभार;पदावर नसताना सरपंच तत्कालीन ग्रामसेवकाचा गैरव्यवहार!* *प्रोसीडिंग पुस्तकात केली...

*कौळाणे ग्रामपंचायतीचा अजब कारभार;पदावर नसताना सरपंच तत्कालीन ग्रामसेवकाचा गैरव्यवहार!* *प्रोसीडिंग पुस्तकात केली अफरातफर*

146
0

*कौळाणे ग्रामपंचायतीचा अजब कारभार;पदावर नसताना सरपंच तत्कालीन ग्रामसेवकाचा गैरव्यवहार!*
*प्रोसीडिंग पुस्तकात केली अफरातफर*
*मालेगांव(कार्यालयीन प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-* आजपर्यत गैरव्यवहाराच्या अनेक घटना आपण वाचल्या असतील.पदाचा गैरवापर करुन सामान्य जनतेला कसे फसविले जाते.याचे अनेक किस्से आपणास दैनदिन जीवनात बघावयास मिळतात.मात्र मुळ गैरव्यहाराचे उगमस्थान हे गाव पातळीवरील ग्रामपंचायतीपासून सुरु झाल्याचे बघावयास मिळते.नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या कौळाणे (निं) ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच सौ.लताबाई बच्छाव या सध्या पदावर कार्यरत नसताना व प्रशासकीय कारकिर्द चालू असताना तत्कालीन ग्रामसेवक संजीव घोंगडे याच्या संगनमताने काल दिनांक २९ सप्टेंबर रोजी मंगळवारी ग्रामपंचायतीच्या प्रोसिंडीग पुस्तकात अफरातफर करुन मोठाच महाप्रताप करुन ठेवला आहे.
याबाबतीत सविस्तर हकीकत अशी की,युवा मराठा न्युज चँनलच्या पत्रकार भवनसाठी ग्रामपंचायत कौळाणे (निं) यांनी सन २०१८सालात गावठाण जागा राजेंद्र रखमाजी राऊत पाटील व इतर या नावाने देऊन तशा प्रकारचा नमूना नंबर ८ चा उतारा,बांधकाम परवानगी ,व ग्रामपंचायतीची कर पावती देखील ग्रामसेवक संजीव घोंगडे आणि सरपंच सौ,लताबाई बच्छाव यांनी राजेंद्र राऊत पाटील यांना दिलेली आहे.असे असताना काल फसवेगिरीचा नवाच महाप्रताप तत्कालीन ग्रामसेवक संजीव घोंगडे व सरपंच लताबाई बच्छाव यांनी पदावर नसताना करुन ठेवला आहे.
*फसवणूकीच्या वेगवेगळ्या पध्दती वापरण्यास सरपंच ग्रामसेवक तरबेज*
वास्तविक सन२०१८ मध्ये पत्रकार भवनला दिलेली जागा हि प्रत्यक्षात ग्रामपंचायतीच्या मालकीची नसतानाही ग्रामसेवक घोंगडे व सरपंच सौ.लताबाई बच्छाव हे देऊन मोकळे झाले.मात्र सदरची जागा हि कौळाणे पंच मंडळीच्या नावे तलाठी दप्तरी असल्याचे दिसताच व हे प्रकरण आपल्या अंगलट येईल असे दिसताच ग्रामसेवक घोंगडे व सरपंच सौ,लताबाई बच्छाव यांनी तात्काळ ती जागा बदलून रमेश माणिक सुर्यवंशी यांच्या घरामागील जागा उपलब्ध करुन दिली.त्या जागेवर कामकाज सुरु केल्यावर तेथे विरोध झाल्याने,ग्रामपंचायत सदस्य रमेश सावंत यांच्या उपस्थितीत कौळाणे गावातील ग्रामपंचायतीच्या विहिरीशेजारील नदीकिनारी असलेली जागा देण्याचे मान्य करुन ग्रामसेवक घोंगडे यांनी तशी नोंद प्रोसिंडींग पुस्तकात घेतली.आणि त्यानुसार येत्या २आँक्टोबर रोजी सदर पत्रकार भवनला मिळालेल्या जागेवर मालेगांवच्या माजी उपमहापौर व नगरसेविका अँड ज्योती भोसले यांचे हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केलेला होता.मात्र त्यापुर्वीच तत्कालीन ग्रामसेवक घोंगडे व सरपंच सौ.लताबाई बच्छाव यांना
*विनाशकाले विपरीत बुध्दी*
सुचली,आणि त्यांनी आपल्याला कुठलाही नैतिक अधिकार नसताना काल दिनांक २९ सप्टेंबर २०२० मंगळवार रोजी प्रोसिडींग पुस्तकात खाडाखोड करुन सदरचा ठराव अध्यक्ष असहमत असल्याचे कारण देऊन रद्द करीत असल्याचे प्रोसिंडींग पुस्तकात लिहले व एका सामाजिक कार्यास अडथळा घातला.
*पदावर नसताना प्रोसिडींग पुस्तक आठ दिवसापासून सरपंचाच्या घरी*
गेल्या आँगस्ट महिन्यापासून कौळाणे ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सुनील बच्छाव यांची नियुक्ती झालेली आहे.तर तेथील ग्रामसेवक दिनेश जाधव हे सध्या कार्यरत असताना पदावर नसलेल्या सरपंचाच्या घरी गेल्या आठ दिवसापासून प्रोसिडींग पुस्तक कोणत्या नियमाने होते?याचाच अर्थ सरपंचाच्या कारकिर्दीत झालेल्या विविध प्रकारच्या ठरावामध्ये तत्कालीन ग्रामसेवक घोंगडेच्या मदतीने अफरातफर करता यावी म्हणूनच ते पुस्तक पदावर नसलेल्या सरपंचाच्या घरी कुणाच्या आशिर्वादाने आठ दिवस ठेवण्यात आले होते.ग्रामसेवक दिनेश जाधव व प्रशासक सुनील बच्छाव यांचे कुठलेही नियंत्रण व वचक ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर नसल्याने हा गैरव्यहाराचा झोल करण्यात आला.
*फसवणूकीचा गुन्हा दाखल करणार* पदावर नसताना सतेची मस्ती डोक्यात शिरल्याने बेकायदेशीरपणे काम करुन ठराव रद्द करणाऱ्या तत्कालीन सरपंच सौ.लताबाई बच्छाव व ग्रामसेवक संजीव घोंगडे यांचेवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन घोंगडेच्या निलंबनाची मागणी करण्याबरोबरच.कर्तव्यात कसूर करुन निष्काळजीपणा करणाऱ्या ग्रामसेवक दिनेश जाधव व प्रशासक सुनील बच्छाव यांच्याही चौकशीची मागणी यावेळी करण्यात येणार आहे.त्यांच्या कार्यकाळात प्रोसिंडिंग पुस्तक बाहेर गेलेच कसे? या मुद्द्यावरुन सदरच्या प्रकरणी सोमवार दिनांक ५ आँक्टोबर रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्याबरोबरच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची नाशिक येथे युवा मराठा न्युजची मालेगांव विभागातील ब्युरो टिम भेट घेऊन तक्रार दाखल करणार आहे,तदनंतर कौळाणे (निं.) ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात येत आहे.

Previous article🛑 मराठा समाजाला EWS आरक्षण नको, संभाजीराजेंची मागणी :- मुख्यमंत्र्यांकडून मान्य 🛑
Next articleअतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावा – खा.प्रताप पाटील चिखलीकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here