Home Breaking News 🛑 दहावी, बारावीच्या ऑक्टोबर फेरपरीक्षा लांबणीवर 🛑

🛑 दहावी, बारावीच्या ऑक्टोबर फेरपरीक्षा लांबणीवर 🛑

107
0

🛑 दहावी, बारावीच्या ऑक्टोबर फेरपरीक्षा लांबणीवर 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 3 सप्टेंबर : ⭕ राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या श्रेणीसुधार तसेच पुनर्परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार नाहीत. राज्यातील कोविड – १९ स्थिती पाहता या परीक्षा आता दिवाळीनंतरच होणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

राज्य मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या पुनर्परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. ‘या परीक्षा सर्वसाधारण स्थितीत ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जातात. परंतु यंदा राज्यावर करोनाचं सावट असल्याने या परीक्षा नोव्हेंबर किंवा कदाचित डिसेंबरपर्यंतही लांबणीवर पडतील,’ असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, दरवर्षी दहावी आणि बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तत्काळ फेरपरीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी दिली गेल्या काही वर्षांपासून मिळत होते. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा निर्णय घेतला होता. यानुसार दहावी, बारावीचा निकाल साधारणपणे मे महिन्यात जाहीर झाल्यानंतर तत्काळ जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षा घेतली जात होती, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नव्हते. पण यंदा परीक्षांचे निकालच मुळात जुलै मध्ये लागल्याने या फेरपरीक्षाही झाल्या नाहीत. यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष वाचवण्याची संधी मिळालेली नाही.

कोविड-१९ संसर्ग स्थितीमुळे यंदा दहावी-बारावीच्या मूल्यांकन प्रक्रियेस आणि पर्यायाने निकालास विलंब झाला. लॉकडाऊनमुळे दहावीची भूगोल विषयाची परीक्षा देखील रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना या विषयाचे सरासरी गुण देण्यात आले. कोविड-१९ संसर्गग्रस्त रुग्णांची संख्या अद्यापही कमी झालेली नाही. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना करोना संसर्गाचा फटका बसला आहे. या सगळ्याचा परिणाम परीक्षांवर होत आहे. करोनामुळे अनेक शाळांच्या इमारतींचे रुपांतर क्वारंटाइन सेंटरमध्ये करण्यात आले आहे. परिणामी तूर्त तरी कोणत्याही परीक्षा घेण्याची राज्य सरकारची मानसिकता नाही. याचाच परिणाम म्हणून दहावी, बारावी फेरपरीक्षा लांबणीवर पडल्या आहेत.⭕

Previous article🛑 PFचे पैसे काढताना ‘या’ अटी-नियमांकडे लक्ष द्या 🛑
Next article🛑 LPG घरगुती गॅसच्याच्या सबसिडीची मिळणार नाही रक्कम ? वाचा काय आहे कारण 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here