Home Breaking News 🛑 LPG घरगुती गॅसच्याच्या सबसिडीची मिळणार नाही रक्कम ? वाचा काय आहे...

🛑 LPG घरगुती गॅसच्याच्या सबसिडीची मिळणार नाही रक्कम ? वाचा काय आहे कारण 🛑

418
0

🛑 LPG घरगुती गॅसच्याच्या सबसिडीची मिळणार नाही रक्कम ? वाचा काय आहे कारण 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 3 सप्टेंबर : ⭕ या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये देखील सरकारकडून मिळणारी सबसिडी (Domestic Gas Subsidy) देण्यात येणार नाही आहे. तुमच्या लक्षात आले असेल की गेल्या 4 महिन्यात तुमच्या खात्यामध्ये Gas Subsidy चे पैसे आले नाही आहेत. सरकारने गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी मे महिन्यापासून रद्द करण्यात आली आहे. असा निर्णय का घेण्यात आला असावा हा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात एप्रिल महिन्यात एलपीजीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली, त्यामुळे मे महिन्यात घरगुती सिलेंडरचे बाजार मुल्य 162.50 रुपयांनी कमी करून 581.50 रुपये करण्यात आले. ज्यानंतर सबसिडी आणि बिना सबसिडीच्या सिलेंडरची किंमत सारखीच झाली. दरम्यान सप्टेंबर महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

➡️ खात्यामध्ये का येत नाही आहे :-

केंद्र सरकारने मे महिन्यापासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये बदल केला आहे. हा बदल करतानाच सरकारने सबसिडी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे मे, जून आणि जुलै मध्य गॅस सिलेंडर घेतल्यानंतर ग्राहकांना सबसिडीचे पैसे ट्रान्सफर केले नाहीत.

दरम्यान गॅस सिलेंडरचे बाजार मुल्य तसंच सबसिडी नसणाऱ्या सिलेंडरची किंमत देखील कमी झाली आहे. तर सबसिडी असणाऱ्या सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. अशावेळी दोन्ही प्रकारच्या सिलेंडरच्या किंमतीतील अंतर जवळपास संपले आहे. त्यामुळेच सरकारन आता घरगुती गॅसवर सबसिडी देणे बंद केले आहे.

➡️ सबसिडी रद्द केल्याचा परिणाम :-

घरगुती गॅस सिलेंडरवर मिळणाऱ्या सबसिडीमध्ये गेल्या वर्षभरापासून कपात केली जात आहे. या दरम्यान सबसिडी असणारा सिलेंडर साधारण 100 रुपयांनी महागला आहे. जर अधिक सिलेंडर हवे असतील तर बाजार मुल्य देऊन खरेदी करावे लागतील.⭕

Previous article🛑 दहावी, बारावीच्या ऑक्टोबर फेरपरीक्षा लांबणीवर 🛑
Next article🛑 एम.आय.डी.सी. स्थानकानंतर विधान भवन स्थानकाचे (साचा) बांधकाम पूर्ण 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here