• Home
  • 🛑 एम.आय.डी.सी. स्थानकानंतर विधान भवन स्थानकाचे (साचा) बांधकाम पूर्ण 🛑

🛑 एम.आय.डी.सी. स्थानकानंतर विधान भवन स्थानकाचे (साचा) बांधकाम पूर्ण 🛑

🛑 एम.आय.डी.सी. स्थानकानंतर विधान भवन स्थानकाचे (साचा) बांधकाम पूर्ण 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 3 सप्टेंबर : ⭕ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ( एम.एम.आर.सी. ) द्वारे विधान भवन मेट्रो स्थानकाच्या साच्याचे काम पूर्ण करण्यात आले असून हे पूर्ण झालेले बांधकाम मेट्रो ३ च्या पॅकेज १ अंतर्गत येते . यात तळाची स्लॅब (base slab), मॅझेनाईन स्लॅब (mezzanine slab), कॉनकोर्स स्लॅब (concourse slab) आणि छताची स्लॅब (roof slab) बांधकामाचा समावेश आहे. पॅकेज ७ अंतर्गत येणाऱ्या एमआयडीसी स्थानकाचे देखील तिन्ही स्लॅबचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

विधान भवन स्थानकाचे बांधकाम ‘कट आणि कव्हर’ या आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. या स्थानकात प्रवाशांसाठी सात प्रवेश-निकसद्वारांची सुविधा असेल.

“मुंबई मेट्रो ३ मार्गिकेवरील विधान भवन स्थानकात चाकरमान्यांची वर्दळ अधिक प्रमाणात असेल. यास्थानकाद्वारे मंत्रालय , विधान भवन , नवीन प्रशासकीय इमारत जोडले जातील, असे एम.एम.आर.सी. चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रणजित सिंह देओल म्हणाले.

विधान भवन स्थानकाचे ७५.४५ % बांधकाम पूर्ण झाले आहे. या स्थानकावरून रोज ७५००० पेक्षा अधिक प्रवासी दररोज प्रवास करणे अपेक्षित आहे. पॅकेज १ अंतर्गत हुतात्मा चौक , चर्चगेट आणि कफ परेड या मेट्रो स्थानकाची कामे देखील वेगात सुरू आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment