• Home
  • 🛑 संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी ….! उदयनराजे भोसले 🛑

🛑 संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी ….! उदयनराजे भोसले 🛑

🛑 संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी ….! उदयनराजे भोसले 🛑
✍️ सातारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा :⭕- शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार – गोडसे हिचं जाणं सातारकारांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी आहे अशी भावना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत उदयनराजेंनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे, त्यात म्हटलं आहे की, कोमलला २०१७ साली “प्लमोनरी हायपरटेन्शन” या व्याधीचे निदान झाले आणि तिचे आयुष्य जणू तिथेच स्तब्ध झाले, पण तिने व तिच्या पतीने धीर सोडला नाही आणि ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली, महाराष्ट्रातील पहिली “दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण” झालेली व्यक्ती कोमल ठरली होती.

पण ३ दिवसापूर्वी कोमलचा आजार अचानक वाढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यांनी तिला ताबडतोब हैदराबाद येथे शिफ्ट केले, परंतु आज पहाटे कोमल आपल्यात न राहिल्याची बातमी समजली आणि धक्का बसला असं ते म्हणाले.

तसेच कोमल आणि तिचे पती धिरज दोघांनी “कोमल न्यू लाईफ फाउंडेशन” या संस्थेची स्थापना केली होती, त्यामार्फत त्यांनी ऑर्गन डोनेशन साठी खूप मोठं काम केलं तसेच गरजूंना वाटेल ती मदत, जनजागृती केली. स्वभावाने अत्यंत प्रेमळ, मनमिळावू, हसतमुख अश्या कोमल ला “सातारा” नेहमी स्मरणात ठेवेल.

माझ्या अगदी लहान बहिणी प्रमाणे असलेल्या कोमलला भावपूर्ण श्रद्धांजली असा शोकसंदेश उदयनराजे भोसले यांनी दिला आहे….⭕

anews Banner

Leave A Comment