• Home
  • 🛑 PFचे पैसे काढताना ‘या’ अटी-नियमांकडे लक्ष द्या 🛑

🛑 PFचे पैसे काढताना ‘या’ अटी-नियमांकडे लक्ष द्या 🛑

🛑 PFचे पैसे काढताना ‘या’ अटी-नियमांकडे लक्ष द्या 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 3 सप्टेंबर : ⭕ प्रोविडेंट फंड अर्थात पीएफ ऑनलाईन पद्धतीने काढण्याचा सोपा मार्ग आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून एक खास सुविधा देण्यात आली आहे. त्याद्वारे पीएफचे पैसे काढणं अधिक सोपं होणार आहे. आता ऑनलाईन आधार-आधारित सुविधेचा वापर करुन EPF खात्यातून पैसे काढता येऊ शकतात.

पीएफचे पैसे काढण्यासाठी काही नियम-अटी लागू आहेत. पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करताना या नियम-अटींचं पालन करणं गरजेचं आहे. या नियमांकडे लक्ष न दिल्यास क्लेम फसण्याची शक्यता असते. पीएफ क्लेम करण्यासाठी अधिकृत साईटवर क्लिक करा.

➡️ काय आहेत नियम-अटी :-

– मेंबरचा यूनिवर्सल अकाऊंट नंबर (UAN)ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे.
– EPF अकाऊंटमध्ये बँक खातं-आधारकार्डशी लिंक असावं.
– कंपनीकडून e-KYC मंजूरी आणि व्हेरिफिकेशन होणं आवश्यक आहे.
– केव्हायसी किंवा बँक डिटेल्स पूर्ण नसल्यास, पैसे काढण्यासाठी क्लेम करु नका.
– अर्ज करण्यापूर्वी UAN लॉग-इन करुन मॅनेज ऑप्शनवर क्लिक करा. तेथे केव्हायसीवर क्लिक करुन आधार क्रमांक आणि बँकेचे तपशील द्या.
– नोकरी सोडल्यानंतर ऑनलाईन क्लेमची सुविधा कमीत-कमी दोन महिन्यांनंतर वापरली जाऊ शकते.
– नोकरी सोडल्यानंतर लगेचच क्लेम केल्यास पैसे अडकण्याची शक्यता असते. तसंच कंपनीची मंजूरीही आवश्यक असते.

➡️ कसा कराल ऑनलाईन क्लेम :-

– ऑनलाईन ‘सर्विसेज टॅब’वर क्लिक करुन ‘क्लेम फॉर्म’वर क्लिक करा.
– मेंबरची माहिती पेजवर अपडेट केली जाते.
– रजिस्टर्ड बँक खात्याचे शेवटचे चार अंक भरावे लागतील.
– बँक अकाऊंट व्हेरिफिकेशनसाठी पुढे जाण्याआधी, ‘सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग’ अप्रुव्ह करावं लागेल.
– व्हेरिफाय झाल्यानंतर मेंबरला ‘प्रोसिड फॉर क्लेम’वर क्लिक करावं लागेल.
– त्यानंतर withdrawal वर क्लिक करुन रक्कम अपडेट करावी लागेल.
– चेकची स्कॅन कॉपी अपलोड करताना मेंबरचा पत्ता विचारला जाईल.
– त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ऑथेंटिकेशनसाठी ओटीपी पाठवला जाईल, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर क्लेम सब्मिट होईल.⭕

anews Banner

Leave A Comment