Home Breaking News 🛑 कोरोनावर उपचार घेताना…! तडफडून मृत्यु पावलेल्या…! पत्रकार पांडुरंग रायकर यांचे शेवटचे...

🛑 कोरोनावर उपचार घेताना…! तडफडून मृत्यु पावलेल्या…! पत्रकार पांडुरंग रायकर यांचे शेवटचे शब्द 🛑

355
0

🛑 कोरोनावर उपचार घेताना…! तडफडून मृत्यु पावलेल्या…! पत्रकार पांडुरंग रायकर यांचे शेवटचे शब्द 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ पुण्यात टीव्ही 9 वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या पांडुरंग रायकर यांचं बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झालं. बुधवारी पहाटे १ वाजून ३३ मिनिटांनी त्यांनी whatsapp ग्रुपवर केलेला मेसेज चांगलाच व्हायरल होत असून कोरोना काळात प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या एका पत्रकाराला वेळेत उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागणं ही धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत एका व्हाट्सअप्प ग्रुपद्वारे आलेल्या संदेशात दिलेला तपशील पुढीलप्रमाणे –

पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर पांडुरंग रायकर यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले. 27 ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी केली जी निगेटिव्ह आली.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला पांडुरंग रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले. मात्र तिथेही त्रास सुरू होता त्यामुळं त्यांची कोपरगावमधे एंटीजेन टेस्ट करण्यात आली जी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर रविवारी 30 ऑगस्टला रात्री त्यांना एम्ब्युलन्समधुन उपचारांसाठी पुण्यात आणण्यात आलं. पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमधे भरती केलं.

जंबो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांची परिस्थिती खालावत होती, त्यामुळं त्यांना दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमधे भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले. मंगळवारी त्यांची ऑक्सीजन पातळी 78 पर्यंत खाली गेली. त्यांना जंबो हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिॲक एम्ब्युलन्सची गरज होती. अशी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी मंगळवारी प्रयत्न सुरू होते . मंगळवारी रात्री एक एम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाला असल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर दुसरी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण त्या एम्ब्युलन्समधे डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत बारा – सव्वाबारा वाजले होते. पहाटे चारला एम्ब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता एम्ब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आयसीयु मधील डॉक्टरांचा आम्ही निघतो आहोत असा फोन आला….⭕ युवा मराठा न्युज चँनल महाराष्ट्र  परिवाराची🌹🌹🌹 भावपुर्ण श्रध्दांजली🌹🌹🌹

Previous article🛑 महावितरणचे ग्राहक आहात?; तुमच्यासाठी आहे ‘ही’ खास बातमी 🛑
Next article🛑 PFचे पैसे काढताना ‘या’ अटी-नियमांकडे लक्ष द्या 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here