• Home
  • 🛑 महावितरणचे ग्राहक आहात?; तुमच्यासाठी आहे ‘ही’ खास बातमी 🛑

🛑 महावितरणचे ग्राहक आहात?; तुमच्यासाठी आहे ‘ही’ खास बातमी 🛑

🛑 महावितरणचे ग्राहक आहात?; तुमच्यासाठी आहे ‘ही’ खास बातमी 🛑

✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे 02 सप्टेंबर :⭕ महावितरण अंतर्गत ग्राहकांना मीटर रीडिंगचे फोटो हे मोबाइल अॅप किंवा वेबसाइटद्वारे पाठविण्यासाठी ‘एसएमएस’ आल्यानंतर आतापर्यंत २४ तासांमध्ये फोटो पाठवावा लागत होता. मात्र, त्याची मुदत वाढविण्यात आली असून, ‘एसएमएस’ आल्यानंतर पाच दिवसांत केव्हाही फोटो पाठविल्यास अचूक बील मिळू शकणार आहे.

‘महावितरणकडून रीडिंगच्या निश्चित तारखेच्या एक दिवस अगोदर ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्यासाठी ‘एसएमएस’द्वारे विनंती करण्यात येते. याबाबतचा मेसेज मिळाल्यानंतर मीटर रीडिंग पाठविण्यासाठी असलेली २४ तासांची मुदत वाढविण्यात आली असून, आता पाच दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाइल अॅप किंवा वेबसाइटद्वारे रीडिंग पाठविता येणार आहे. ग्राहकांनी पाठविलेले रीडिंग हे स्वीकारण्यात येत आहेत’ असे महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी सांगितले.

महावितरणकडून केंद्रीकृत वीजबील प्रणाली सुरू करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या एक ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहेत. रीडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ही ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद करण्यात आली आहे. मीटर क्रमांक देखील नमूद आहे. रीडिंगच्या निश्चित तारखेच्या एक दिवसअगोदर महावितरणकडून ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे विनंती केली जाते. त्यासाठी असलेली २४ तासांची मुदत वाढवून पाच दिवसांचा कालावधी करण्यात आला आहे. ग्राहकांनी मीटरच्या रीडिंगचा फोटो पाठविल्यास महावितरणकडून घेण्यात आलेल्या रीडिंगऐवजी ग्राहकांनी पाठविलेल्या रीडिंगनुसार बील तयार करण्यात येत असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

– मीटर रीडिंग पाठविण्यासाठी महावितरणचे मोबाइल अॅप डाऊनलोड करा. त्यासाठी महावितरणकडे मोबाइल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी असणे आवश्यक आहे.

– महावितरणच्या मोबाइल अॅप मध्ये ‘सबमीट मीटर रीडींग’वर क्लिक केल्यावर मीटर क्रमांक येईल.

– मीटर रीडिंग घेताना वीजमीटरच्या स्क्रिनवर तारीख व वेळेनंतर रिडिंगची संख्या व केडब्लूएच (kwh) असे दिसल्यानंतर (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा.

– फोटोनुसार अॅपमध्ये रीडिंग नमूद करून ते सबमिट करावे.

– मोबाइल अॅपमध्ये लॉगिन केल्यानंतर मीटर रीडिंग थेट सबमिट करता येईल.

– गेस्ट म्हणून मीटर रीडिंग सबमीट करताना नोंदणीकृत मोबाइलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल.

– www.mahadiscom.in वेबसाइटवरून फोटो व मीटर रीडिंग अपलोड करायचे असल्यास ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन आणि लॉगइन करणे आवश्यक आहे.⭕

anews Banner

Leave A Comment