Home भंडारा तलावात बुडुन विद्यार्थ्यांचा मृत्यू. तुमसर तालुक्यातील डोंगराला येथिल घटना.

तलावात बुडुन विद्यार्थ्यांचा मृत्यू. तुमसर तालुक्यातील डोंगराला येथिल घटना.

91
0

आशाताई बच्छाव

IMG_20231203_204422.jpg

तलावात बुडुन विद्यार्थ्यांचा मृत्यू.

तुमसर तालुक्यातील डोंगराला येथिल घटना.

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )आई शेतावर गेली म्हणून तिच्या मागोमाग रविवार सुट्टीचा दिवस असल्याने शेतावर जात असताना गावालगतच्या जवळच्या तलावात पाय घसरुन तलावाच्या पाण्यात इयत्ता चौथ्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा बुडुन मृत्यू झाल्याची घटना ३ डिसेंबर रोजी सा़यकाळी घडली.

विर तेजलाल पटले(१०)रा.डोंगरला ता तुमसर असे मृतक विद्यार्थ्यांचे नाव आहे.

मृतक विर पटले हा विद्यार्थी गावातीलच जि.प पुर्व माध्यमिक शाळा डोंगरला येथिल इयत्ता चौथ्या वर्गात शिकत होता.रविवारी शाळेला सुट्टी असल्याने तो आईच्या मागोमाग शेतावर जात असताना तलावाजवळ शौचास बसला होता.दरम्यान त्याचा तलावांच्या पाण्यात पाय घसरुन जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली. दरम्यान विरच्या आईच्या मागोमाग आलेला मुलगा अद्याप तिच्या पर्यंत पोहचला नसल्याचे माहीत होताच ती घराकडे परत येत असताना मुलगा तलावात पाण्यात पाय घसरुन बुडुन मृत्यू झाल्याची माहिती होताच आईने घटनास्थळीच ह़ंबरडा फोडला.त्यावेळी गावातील नागरिकांना सदर घटनेची माहिती होताच घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती.मृतक विर च्या मृत्यू पश्चात आई -वडील ,एक भाऊ असा परिवार आहे.विर च्या मृत्यूने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous articleसरकारी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन वितरक यांचा प्रस्न मांडणार – आमदार यशोमती ठाकूर
Next articleआगामी काळात निवडणुकाच होणार नाही; ‘अंनिस’च्या श्याम मानव यांचे भाकीत सामाजिक मूल्यांचा ह्रास होत आहे.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here