• Home
  • *मराठा समाजाची समाज जागृती* *चौथी मोहीम मिणचे गावांत*

*मराठा समाजाची समाज जागृती* *चौथी मोहीम मिणचे गावांत*

*मराठा समाजाची समाज जागृती* *चौथी मोहीम मिणचे गावांत*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ* *युवा मराठा न्युज)*

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. राज्यभर आरक्षणा विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव व परिसरातील ३१ गावांमध्ये मराठा समाज जागृती मोहीम राबवली जात आहे .
तसेच आजची मोहीम हातकणंगले तालुक्यातील मिणचे गावांतील हनुमान मंदिरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून सुरूवात करण्यात आली.
संपूर्ण राज्यात मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन , मोर्चा लाक्षणिक उपोषण केली जात असुन सुद्धा राज्य सरकार व केंद्र सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.
या निर्ढावलेल्या सरकारला वेळीच ठिकाण्यावर आणलेच पाहीजे.
कारण आपल्या पुढच्या पिढीला धोका निर्माण होणार आहे.
यावेळी आपण आपल्या मराठा समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात आपण सर्वांनी भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन मराठा आरक्षण मिळविण्यासाठी मोठा लढा देण्याची गरज आहे. आरक्षण मिळाले नाही तर मंत्रालयावरती मोर्चा काढण्याची आवश्यकता भासली तर ती सुद्धा तयारी मराठा समाज मागे पुढे पाहणार नाही.
मराठा समाजाला संघर्ष केल्याशिवाय आत्ता पर्यंत काहीच मिळालेल नाही .
इथुन पुढे कसलाही शासकीय महसुल न भरण्याचे मराठा समाजाच्या वतीने बहीष्कार घालण्याचे ठरविले आहे.
मराठा समाजाचे अभ्यासक पुंडलिक बिरंजे आळते , हनुमंत पाटील सावर्डे ,विजयसिंह शिंदे वडगांव , प्रल्हाद पाटील घुणकी ,
मच्छिंद्र पाटील पारगांव , बाळासाहेब पाटील पारगांव , डाँ.अभयसिंह यादव वडगांव ,
व्ही.बी.पाटील पाडळी ,
आसमान मोहीते घुणकी इत्यादी मराठा आभ्यासक उपस्थित होते.
“एक मराठा लाख मराठा”
” छत्रपती शिवाजी महाराज की जय” “आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे ” यावेळी अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी मिणचे गावांतील मराठा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

anews Banner

Leave A Comment