Home भंडारा माता रमाई आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त

माता रमाई आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त

47
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_080052.jpg

माता रमाई आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त

विदर्भ स्तरीय दोन दिवसीय कलाकार मेळावा 21 व 22 फेब्रुवारीला सातलवाडा येथे

भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )साकोली तालुक्यातील सातलवाडा येथे माता रमाई आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महामाया गीत गायन मंडळ साकोली व त्रिशरण कलाकार मंडळ सातलवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने 21 व 22 फेब्रुवारी 2024 रोज बुधवार व गुरुवारला सकाळी १०.३० वाजता भव्य विदर्भस्तरीय दोन दिवसीय कलाकार मेळाव्याचे आयोजन महात्मा फुले स्मारक जिल्हा परिषद शाळेचे भव्य पटांगण या ठिकाणी करण्यात आलेले असून 21 फरवरी 2024 ला कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार नाना पटोले यांच्या हस्ते होईल . सहउद्घाटक म्हणून होमराज कापगते पंचायत समिती सदस्य ,अनिलभाऊ किरणापुरे पंचायत समिती सदस्य उपस्थित राहतील . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम बोंद्रे मुंबई हे उपस्थित राहतील . तर उपाध्यक्षपदी मदन रामटेके समाज कल्याण सभापती भंडारा हे उपस्थित राहतील .रात्री ८.३० वाजता धिक्कार नाटकाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे 22 फरवरी 2024 रोज गुरुवार सकाळी १० वाजता कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेली आहे. या मेळाव्याचे उद्घाटन डॉ. ब्रह्मानंद कुरंजेकर करतील .सहउद्घाटक म्हणून निखिल मेश्राम सदस्य तथा अभिनंदन बार हे राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रजनीताई गिरेपुंजे तालुका अध्यक्ष राका मोरगाव अर्जुनी उपस्थित राहतील. उपाध्यक्ष शुभांगी वाढवे सखी मंच गोंदिया ह्या उपस्थित राहतील. सत्कार मूर्ती म्हणून अनिताताई बांबोळे माजी सरपंच चिचटोला , डॉ .विजयकुमार यावलकर ,व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे (भंडारा )उपस्थित राहतील. रात्री आठ वाजता भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटक म्हणून मंगेश भोंडे तर सह उद्घाटक म्हणून केशव भोंडे आणि कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भीमावती पटले माजी सरपंच जांभळी हे उपस्थित राहतील. प्रवेश फी 350 करण्यात आलेली आहे. प्रथम बक्षीस४५००, द्वितीय बक्षीस४०००, तृतीय बक्षीस३०००/ चतुर्थ बक्षीस २०००/,पंचम बक्षीस१००/ रुपये ठेवण्यात आलेले आहे कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन आयोजक प्रबोधनकार उमेश बोरकर यांनी केलेले आहे.

Previous articleतळा ज्युनियर कॉलेज इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद प्रदान समारंभ संपन्न
Next articleविखुरलेल्या पाखरांप्रमाणे तब्बल ३६ वर्षांनी भेटले तुमसर शाळेतील मित्र-मैत्रिणी..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here