Home पालघर जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात फक्त नावापुरते टावर

जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात फक्त नावापुरते टावर

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0079.jpg

जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात फक्त नावापुरते टावर

नेटवर्क नसल्याने नागरिक झाले हैराण
मोखाडा प्रतिनिधी : युवा मराठा न्युज

एकीकडे जग हे डिजिटल युग म्हणून होत चालले आहे परंतु पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेला जव्हार तालुक्यातील दाभेरी ग्रामपंचायत,वावर वांगणी ग्रामपंचायत, बोपदरी ग्रामपंचायत , ओझर ग्रामपंचायत या गावामध्ये साधं बोलायला सुद्धा रेंज नसल्याने नागरिक आता खूपच हैराण झाले आहेत .
जव्हार तालुक्यातील अनेक गावांना जिओ टावर उभारून त्याला 2,3 वर्ष होवून गेले परंतु ते चालू केलेले नाहीत .येथील नागरिकांचे असे म्हणणे आहे की आता सगळी कडे ऑनलाईन पद्धतीने काम चालू असल्याने आमच्या गावात कधी नेटवर्क ची सुविधा पूर्ण होईल साधं कुणाची संवाद साधायला त्यांना गावापासून 2,3 किलोमिटर अंतरावर जावे लागत असल्याने येथील नागरिकांना सध्या आपल्या भागात काय चाललय हे सुध्दा माहिती होत नाही . दाभेरी ग्रामपंचायत मध्ये एक दुःखद घटना घडली होती जियो टावर वरून महेश खुताडे वय १९ वर्ष याने खाली उडी मारून आत्महत्या केली असून या साठी जियो टावर उभारून ठेवले आहेत का या अशा देखील येथील नागरिकांना पडला आहे प्रश्न ? तसेच वावर वांगणी ग्रामपंचायत मधील देखील खूप बिकट अवस्था बघायला मिळत आहे या साठी विक्रमगड विधानसभेचे आमदार श्री सुनिल भूसारा साहेब यांनी वावर वांगणी ग्रामपंचायत मध्ये लवकरच नेटवर्क येईल अशी घोषणा केली होती परंतु कोरोना मुळे कुठे तरी काम झालेलं दिसतं नाही परंतु येथील नागरिक आता खूपच त्रासाहून गेले आहेत फक्त प्रतिनिधी येतात नुसते आश्वासन देवून जातात तर येथील नागरिकांचे अशी मागणी आहे की शासनाने प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी .

Previous articleयोजनांचे लाभधारक व कार्यान्वयीन यंत्रणेसाठी “शासन आपल्या दारी” अभियान मोलाचे
Next articleसमृद्धी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here