Home जळगाव मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख पदी खुशाल बिडे यांची निवड

मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख पदी खुशाल बिडे यांची निवड

44
0

आशाताई बच्छाव

IMG_20231215_080846.jpg

मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख पदी खुशाल बिडे यांची निवड
चाळीसगाव (प्रतिनिधि विजय पाटील) येथील साप्ताहिक विराट महाराष्ट्राचे संपादक , अखिल भारतीय मराठा महासंघाचे चाळीसगाव शहराध्यक्ष खुशाल बिडे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघा साठी भरीव योगदान दिल्याने मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब दिलीप जगताप यांनी नगर येथील शासकीय विश्रामगृह येथील बैठकीत जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पदी बिनविरोध निवड करून तसे नियुक्तीपत्र देऊन खुशाल बिडे यांचे अभिनंदन केले. या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले व चाळीसगाव शहर उपाध्यक्ष कैलास पाटील उपस्थित होते. अभिनंदनपत्र आभार मानताना खुशाल बिडे यांनी आपण केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा दिला. मराठा महासंघाचे शहराध्यक्ष पद असल्याने सामाजिक व राजकीय क्षेत्रात एक चळवळ उभी करू शकलो असल्याचे बिडे यांनी सांगितले. जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख पदी खुशाल बिडे यांची निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here