Home पालघर वाडा पूर्व वन विभागाकडून वन महोत्सव साजरा

वाडा पूर्व वन विभागाकडून वन महोत्सव साजरा

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20230702-WA0032.jpg

वाडा पूर्व वन विभागाकडून वन महोत्सव साजरा
वाडा पूर्व विभागातून दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येणारा वन महोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने तसेच ग्रामस्थांच्या व नौदलातल्या प्रमुखांकडून वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आले, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वनविभाग जव्हार वनपरिक्षेत्र पूर्व वाडा वन परिमंडळ शेला कोलीम सरोवर कं.नं. 158 मध्ये वन महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री स्वप्निल साळुंखे यांच्या उपस्थित सदर कार्यक्रम पार पाडण्यात आला, शेला गावचे सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. वन महोत्सव साजरा करून वृक्षारोपणाचा महत्त्व पटवून महत्त्व पटवून दिले ,कार्यक्रम सदर कोलीम सरोवर,शेला गावात राबवण्यात आला तेथे गावचे सरपंच,ग्रामस्थ तसेच नौदल चे अधिकारी/कर्मचारी तसेच पत्रकार यांनी उपस्थित राहुन वृक्षारोपण कार्यक्रमास सहभाग दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here