Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षात कोणी शरद पवार साहेब सोबत तर कोणी अजितदादा...

अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षात कोणी शरद पवार साहेब सोबत तर कोणी अजितदादा पवार सोबत राजकीय अनेकांना धक्का.

84
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230703-100429_WhatsApp.jpg

अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षात कोणी शरद पवार साहेब सोबत तर कोणी अजितदादा पवार सोबत राजकीय अनेकांना धक्का.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा
पी.एन.देशमुख
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 आमदार सोबत घेऊन अजित पवार हे राज्य सरकारमध्ये रविवारी सामील झाले. अजित दादा यांनी उपमुख्यमंत्री पदासह ९ दिग्गज आमदार यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. आता घड्याळाचे काटे उलटे फिरायला ही घटना पूरेशी मानली जात आहे. मात्र, या राजकीय भूकंपाने अनेकांना धक्का बसला आहे. सत्तेसाठी काही पण करू शकतात, असाही काहींचा सूर उमटला आहे. तथापि, अमरावतीजिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सुद्धा द्वीध अवस्थेत असून, शरद पवार साहेब, तर कोणी अजितदादा सोबत असल्याचे चित्र आहे. माजी मंत्री तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हे शरद पवार यांचे खंदे समर्थक असून, यापुढेही त्यांच्यात नेतृत्वात काम करेल असे स्पष्ट केले. माजी मंत्री शरद तसरे यांनी शरद पवार यांचा समर्थक असून उर्वरित आयुष्य त्यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट केले. मोर्शी वरुड चे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादी समर्थक आहेत. भुयार सोमवार ३ जुलै रोजी कार्यकर्ते, समर्थकांची बैठक घेणार असून त्यानंतर निर्णय घेतील असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते संजय खोडके यांनी मी अजित दादा पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे या शरद पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादीचे वाशिम जिल्हा निरीक्षक संतोष महात्मे हे अजित पवार सोबत आहे. अजितदादांचे विचार नेतृत्वाची राज्याला गरज असल्याचे महात्मे म्हणाले. राष्ट्रवादीचे अमरावती शहराध्यक्ष प्रशांत डवरे नाॅट रीचीबलहोते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वराडे यांच्याशी संपर्क करा साधला असता त्यांनी घडामोडी बाबा मला काहीच माहित नाही, दोन दिवसात यासंदर्भात पत्र परिषद आयोजित करून भूमिका स्पष्ट केली जाईल, असे ते आमचे
वृत्तपत्राचे “ब्युरो चीफ रिपोर्टर”शी बोलताना म्हणाले.

Previous articleवाडा पूर्व वन विभागाकडून वन महोत्सव साजरा
Next articleमहाराष्ट्राच्या राजकारणामुळे सामान्यांना वैताग
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here