Home जालना कुच्चरवटा येथील कुंटण खाण्यावर छापा टाकून 03 पुरुष आरोपीसह 01कुंटनखाना चालविणारी महिला...

कुच्चरवटा येथील कुंटण खाण्यावर छापा टाकून 03 पुरुष आरोपीसह 01कुंटनखाना चालविणारी महिला अटकेत.

66
0

आशाताई बच्छाव

1000293654.jpg

कुच्चरवटा येथील कुंटण खाण्यावर छापा टाकून 03 पुरुष आरोपीसह 01कुंटनखाना चालविणारी महिला अटकेत.
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 17/04/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, जुना जालना भागांमधील कुच्चरवटा,आमिर नगर येथे एक महिला कुंटणखाना चालवित असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खनाळ यांना सूचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने दिनांक 16/0 4/ 2024 रोजी अमीरनगर जुना जालना येथे महिला नामे जाकीराबेगम मोईनुद्दीन खान राहणार जालना ही तिच्या घरामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रूम करून बाहेरून स्त्रियांना आणून वेश्याव्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी छापा टाकून त्या ठिकाणी कुंटणखाना चालविणारी महिला नामे जाकीराबेगम मोहिनुद्दीन खान वय ४९ वर्ष राहणार कुच्चरवटा अमीर नगर जालना, 03 पीडित महिला, 03 पुरुष असे मिळून आले असून त्यांच्या ताब्यातून रुपये 5230 रोख व पाच मोबाईल असा एकूण 45 230 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन कुंटणखाना चालविणारी महिला आरोपीं जाकीरा बेगम मोईनुद्दीन खान वय ४९ वर्ष राहणार कुच्चरवटा अमीर नगर जालना व तेथे आढळून आलेले पुरुष आरोपी नामे 1)अनिल जालिंदर मिसाळ वय 28 वर्षे राहणार मांडवा तालुका बदनापूर जिल्हा जालना 2)बाळू दशरथ शिंदे वय 46 वर्ष राहणार बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर 3) आफताब शफिक शेख वय 30 वर्ष राहणार संभाजीनगर जालना यांचे विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या सरकारतर्फे फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खानाळ, सहा. पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, रमेश राठोड, इर्शाद पटेल ,सतीश श्रीवास, महिला पोलीस अमलदार शडमल्लू,आर.डि. बांडे सर्व जालना यांनी केली आहे.

Previous articleउंद्री प.दे. येथील पार्वती माता मंदिर येथे मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन.
Next articleजालना शहरातील बडी सडक रोडवर गतीरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here