• Home
  • *वडगांव ग्रामदैवत* *श्री महालक्ष्मी देवीस चांदीची* *प्रभावळी लोकार्पण,*

*वडगांव ग्रामदैवत* *श्री महालक्ष्मी देवीस चांदीची* *प्रभावळी लोकार्पण,*

*वडगांव ग्रामदैवत*
*श्री महालक्ष्मी देवीस चांदीची* *प्रभावळी लोकार्पण,*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ* *युवा मराठा न्युज)*

“लाखात एक वडगांवची लेक ”

“जिथे दान देण्याची सवय असते”
“तिथे संपत्तीची कमी नसते ”
आणि “जिथे माणुसकिची शिकवण असते ”
“तिथे माणसांची कमी नसते”
समाजकार्य असो किंवा धार्मिक कार्य वडगांवची लेक नेहमीच एक पाऊल पुढे असते.
वडगांव नगरीचे भाग्यविधाते रौप्यमोहत्सवी नगराध्यक्ष स्व.विजयसिंह यादव यांची
लाखात एक वडगांवची लेक
म्हणजे कल्याणी सखी मंच, श्री विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा , माजी.नगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका व श्री शाहू शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.विद्या गुलाबराव पोळ यांनी आत्ता पर्यंत राजकीय, सामाजिक , शैक्षणिक व धार्मिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे एवढेच न्हवे तर आपल्या गावावर आलेले कसलही संकट असो ते दूर करण्यासाठी त्या नेहमीच अग्रेसर असतात.
महापुराच्या संकटात अडकलेल्या नागरीकांना जेवनाची व राहणेची सोय केली , कोरोनाच्या महामारी संकटात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप , संपूर्ण वडगांव शहरात औषध फवारणी ,
श्री विजयसिंह यादव प्रतिष्ठान मार्फत कोविड रूग्णांसाठी दैनंदिन आहाराचे उत्कृष्ट नियोजन केले.
शैक्षणिक क्षेत्रातही सौ.विद्याताई पोळ यांनी गरुड भरारी घेतली आहे त्यांच्या नावा प्रमाणेच त्यांचे या क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे कल्याणी शिशु विहार , श्री बळवंतराव यादव मराठी शाखा , श्री बळवंतराव यादव हायस्कूल & ज्युनियर कॉलेज ,
विजयसिंह यादव आर्ट्स, कॉमर्स & सायन्स सिनियर कॉलेज , कल्याणी पोळ इंग्लिश मिडियम स्कुल एवढेच न्हवे तर डॉ.सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कुल ची स्थापना करून त्यांनी पेठ वडगांव मध्ये KG ते PG शिक्षणाची सोय करून दिली आणि याच माध्यमातून हजारो लोकांना नोकऱ्या ही दिल्या.
विद्याताई यांनी धार्मिक कार्यात आणखी एक माणाचा तुरा खोवला आहे तो म्हणजे
वडगांव ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीस भक्त माजी नगराध्यक्षा सौ.विद्याताई पोळ यांच्या वतीने स्व.विजयसिंह यादव यांच्या स्मरणार्थ चांदीची प्रभावळ लोकार्पण करण्यात येणार आहे.
हे काम कोल्हापूर येथे करण्यात येत आहे. व्ही.के.पोतदार हुपरीकर सराफ पेढीचे अजिंक्य पोतदार यांच्या वतीने हे काम करण्यात येत आहे.यांचे लवकरच लोकार्पन करण्यात येणार आहे. या कामांची पाहणी माजी नगरसेवक राजकुमार पोळ, माजी नगराध्यक्ष अभिजीत पोळ, माजी
उपनगराध्यक्ष आनंदा म्हेत्रस,अभिजीत गायकवाड,रायसिंग भोसले, सचिन चव्हाण,आप्पासाहेब पाटील,विवेक दिंडे,सुहास जाधव,विशाल वडगावे,सचिन पाटील आदी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment