Home जळगाव चाळीसगाव महाविद्यालयात संगणक विभागात पोस्टर प्रदर्शन स्पर्धा संपन्न

चाळीसगाव महाविद्यालयात संगणक विभागात पोस्टर प्रदर्शन स्पर्धा संपन्न

108

आशाताई बच्छाव

Screenshot_20231010-054634_WhatsApp.jpg

चाळीसगाव महाविद्यालयात संगणक विभागात पोस्टर प्रदर्शन स्पर्धा संपन्न

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – बी.पी. आर्ट्स एस.एम.ए सायन्स, के.के.सी. कॉमर्स कॉलेज चाळीसगाव आयोजित संगणकशास्त्र विषयांतर्गत पोस्टर व मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 50 पोस्टर व 10 मॉडेल चे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी संगणक विषयाचे विविध भागांचे व संगणक भाषेचे पोस्टर व मॉडेल प्रेझेंटेशनच्या साहाय्याने सुंदर सादरीकरण केले. सदर स्पर्धेमध्ये एफ. वाय, एस. वाय, आणि टी. वाय. बी. एस्सी. च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांच्या हस्ते झाले तर उपप्राचार्य डॉ. अजय काटे ,प्रा. दिपक आवटे , डॉ योगिनी वाघ हे उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेल्या पोस्टर व मॉडेल प्रेझेंटेशनच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ के. सी. देशमुख, राष्ट्रीय महाविद्यालय यांनी काम बघितले.
प्रस्ताविक डॉ. योगिनी वाघ यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजन प्रा. दिपक आवटे, सूत्रसंचालन प्रा. रश्मी साळुंखे यांनी केले. कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न प्रा. मोरे हर्षा, प्रा. पाटील यामिनी, प्रा. शिरोडे निकिता, प्रा. देशमुख माधुरी, सौरभ त्रिभुवन, शुभम पाटील यांनी सहकार्य केले.

Previous articleप्लास्टिक पासून होणारे परिणाम यावर राष्ट्रीय महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न
Next articleभाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी संजय पाटील
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.