Home जळगाव प्लास्टिक पासून होणारे परिणाम यावर राष्ट्रीय महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

प्लास्टिक पासून होणारे परिणाम यावर राष्ट्रीय महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20231009-WA0059.jpg

प्लास्टिक पासून होणारे परिणाम यावर राष्ट्रीय महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव व देवरे फाउंडेशन आयोजित” एका प्लास्टिकची दुसरी गोष्ट” प्लास्टिक पासून होणारे परिणाम यावर राष्ट्रीय महाविद्यालय हिरापूर रोड चाळीसगाव येथे कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब अध्यक्ष ब्रिजेश ( भैया ) पाटील यांनी केले. प्रकल्प मार्गदर्शक रोटे डॉ.सौ उज्वला देवरे यांनी प्रकल्पाची संकल्पना मांडली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सौ संगीता चव्हाण यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस आर जाधव यांनी भूषवले. प्रकल्प प्रमुख रोटे,अनिल मालपुरे यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी पुणे व मुंबई येथून ग्रीन वर्क ट्रस्टच्या मार्गदर्शिका कु. गार्गी गीध व सौ रुपाली नाईक यांनी प्लास्टिक पासून होणारे दुष्परिणाम, प्लास्टिकचे वीस वर्षापासून ते चारशे वर्षांपासूनचे आयुष्य व प्लास्टिकचे पार्टीकल तयार होऊन ते डम्पिंग स्टेशन ,नाले, गटारी , समुद्र व समुद्रातून मासे व आपल्या अन्नसाखळीत शिरून ते माणसाच्या शरीरापर्यंत पोहोचून रक्तात सुद्धा प्रवेश केला आहे. असे सविस्तर विवेचन प्लास्टिक पासून होणारे दुष्परिणामांचे विद्यार्थ्यांना दिले. कार्यक्रमासाठी रोटे बलदेव पूंशी, राजेंद्र कटारिया, सोपान चौधरी, सीमा शर्मा, सौ सरोज जाधव, सौ सरला साळुंखे यासह डॉ, रवींद्र निकम, उप प्राचार्य मगर मॅडम व राष्ट्रीय महाविद्यालयातील सर्व कर्मचारीवृद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रा. निकम सर यांनी केले.

Previous articleपत्रकार लक्ष्मण सोळुंके हल्लाप्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी
Next articleचाळीसगाव महाविद्यालयात संगणक विभागात पोस्टर प्रदर्शन स्पर्धा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here