• Home
  • सांगली-कोल्हापूर मार्गावर पायोस हॉस्पिटल समोर सापडाला सदृश्य बाँम्ब

सांगली-कोल्हापूर मार्गावर पायोस हॉस्पिटल समोर सापडाला सदृश्य बाँम्ब

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210322-WA0001.jpg

सांगली-कोल्हापूर मार्गावर पायोस हॉस्पिटल समोर सापडाला सदृश्य बाँम्ब

जयसिंगपूर : शहरातील कोल्हापूर-सांगली महामार्गावरील पायोस हॉस्पिटल समोर सदृश्य बाँम्ब सापडला .शहरात प्रथमच घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. जयसिंगपूर पोलिस व कोल्हापूर बॉम्ब शोध व नाशक पथकाच्या प्रयत्नानंतर सदरचा जिलेटींग (गावठी बॉम्ब) निकामी केल्यानंतर शहरवासीयांनी सुटकेचा निश्वास घेतला.
सांगली कोल्हापूर मार्गावरील डॉ. सतिश पाटील यांचे पायोस हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या कंपाऊडलगत गुरूवारपासून बेवारस अवस्थेत प्लॉस्टिकच्या पोत्यामध्ये काही साहित्य पडून होते. मात्र, सिक्यूरिटी गार्डने सदरचे साहित्य पेशंटच्या नातेवाईकांचे असेल म्हणून दुर्लक्ष केले होते.
रविवारी सकाळी हॉस्पिटमधील भरत पाटील या कर्मचार्‍याच्या हे साहित्य असलेल्या टिक-टिक आवाज आला. यामुळे त्याने तपासले असता आतमध्ये प्लॉस्टिकच्या पाईप, वायर, आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटसारखे साहित्य आढळून आले.
तर या पोत्यामधून बराच अंतरापर्यंत एक केबल पडलेली लक्षात आली. याबाबतची माहिती पाटील यांनी तात्काळ डॉ. सतिश पाटील यांच्या कानावर घालून जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगड्डे यांना कळविली. काही वेळातच कोल्हापूरहून बॉम्ब शोध व नाशक पथक, ठसे तज्ञ, श्वान पथक असा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
डिवायएसपी रामेश्वर वैजणे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकातील हेड कॉन्स्टेबल मानसिंग पाटील, विनायक लाटणे, मुस्ताक शेख, पोलिस नाईक जयंत पाटील, अशीष मिठारे, जीवन कांबळे, रवि पाटील, विनायक डोंगरे, ‘मर्फी’ श्वान यांनी सुमारे 1 तासाच्या
आला.     (युवा मराठा न्युज नेटवर्क कोल्हापूर )

anews Banner

Leave A Comment