• Home
  • ठाकरे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, सोमवारपासून जमा होणार खात्यात पैसे

ठाकरे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, सोमवारपासून जमा होणार खात्यात पैसे

ठाकरे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, सोमवारपासून जमा होणार खात्यात पैसे (मनोज बिरादार युवा मराठा न्युज)-मुंबई. राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे फार मोठे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. अखेरीस त्याच्या संदर्भात निर्णय घेतला असून, दिवाळी आधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली.या बैठकीनंतर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदती बद्दलची माहिती दिली आहे. वडेट्टीवार म्हणाले राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याचे वचन दिले होते ते सरकार पूर्ण करत आहे निवडणूक आयोगाला मदत वाटपाबाबत पत्र देण्यात आले आहे. अशा प्रकरणात निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात होईल असे वडेट्टीवार यांनी सांगितले.राज्यात परतीच्या पावसाने अनेक भागात झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरे करून केली. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी मदत करणार असल्याचे सांगत धीर दिला होता.

anews Banner

Leave A Comment