Home नाशिक दहिवड येथे मुस्लिम समाजाचा कुर्बानी न देण्याचा संकल्प

दहिवड येथे मुस्लिम समाजाचा कुर्बानी न देण्याचा संकल्प

211

आशाताई बच्छाव

Screenshot_20230628-201057_WhatsApp.jpg

दहिवड येथे मुस्लिम समाजाचा कुर्बानी न देण्याचा संकल्प

प्रतिनिधी. प्रवीण अहिरराव युवा मराठा न्यूज

देवळा तालुक्यातील दहिवड येथील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साजरी करताना कुर्बानी न देण्याचा संकल्प केला असून, मंगळवारी दिनांक .27 तशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयात सादर करण्यात आले. येत्या गुरुवार दिनांक. 29 रोजी हिंदू बांधवांचा पवित्र अशा आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद असल्याने या दिवशी दहिवड येथील मुस्लिम समाज बांधव कोणत्याही प्रकारे कोणतीही कुर्बानी देणार नाही. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे . हिंदू ,मुस्लिम बांधवांच्या या एकोप्याने दहिवड गावात समाधान व्यक्त करण्यात आले आहे. यावेळी बाबू बशीर तांबोळी, गफ्फार तांबोळी, भिकन तांबोळी, मुन्ना शेख, बिलालभाई, अन्वरभाई उपस्थित होते. या निर्णयाचे उपसरपंच राजाराम ठाकरे ,ग्रामपंचायत सदस्य दिगंबर सोनवणे, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर, पुंजाराम अण्णा देवरे, शरद देवरे, माजी पोलीस पाटील मधुकर शिंदे ,रवींद्र सोनवणे, गणेश सोनवणे, संदीप पवार, आदींनी स्वागत केले.