• Home
  • 🛑 **२२, जुलै रोजी शरद पवारांसह नवनियुक्त राज्यसभा खासदारांचा शपथविधी** 🛑

🛑 **२२, जुलै रोजी शरद पवारांसह नवनियुक्त राज्यसभा खासदारांचा शपथविधी** 🛑

🛑 **२२, जुलै रोजी शरद पवारांसह नवनियुक्त राज्यसभा खासदारांचा शपथविधी** 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕मार्च महिन्यात राज्यसभेच्या सात जागांसाठी झालेली निवडणूक बिनविरोध झाली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि फौजिया खान ,रिपाइंचे रामदास आठवले. भाजपाचे उदयनराजे भोसले आणि डॉ. भागवत. शिवसेनेच्या प्रियांका आणि काँग्रेसचे राजीव सातव बिनविरोध निवडून आले होते. या नवनियुक्त खासदारांचा शपथविधी मार्च महिन्यातच संपन्न होणार होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा शपथविधी होऊ शकला नव्हता.

मात्र आता या नवनियुक्त खासदारांच्या शपथविधीसाठी मुहूर्त निघाला आहे. येत्या २२ जुलै रोजी शरद पवारांसह इतर खासदारांना शपथ दिली जाणार आहे. राज्यसभेचे नवनियुक्त ६१ सदस्यांना बुधवारी शपथ दिली जाईल. विशेष म्हणजे संसदेचे अधिवेशन नसताना पहिल्यांदा हा सोहळा सभागृहात संपन्न होणार आहे.

राज्यसभेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शपथविधी सोहळ्यात प्रत्येक सदस्याला त्यांच्याबरोबर केवळ एका अतिथीला सोबत आणण्याची परवानगी देण्यात आली आहे.

राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांनी राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही विभागांच्या संबंधित संसदीय स्थायी समितीच्या बैठका पुन्हा सुरू ठेवण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला आहे….⭕

anews Banner

Leave A Comment