• Home
  • वरळी पॅटर्न फेल?; करोना रुग्णांची संख्या दोन हजाराच्या घरात!

वरळी पॅटर्न फेल?; करोना रुग्णांची संख्या दोन हजाराच्या घरात!

🛑 वरळी पॅटर्न फेल?; करोना रुग्णांची संख्या दोन हजाराच्या घरात!🛑
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :- वरळीतील करोना रुग्णांची संख्या रोखणं वरळी पॅटर्नमुळे शक्य झालं असून या पॅटर्नची इतर ठिकाणीही अंमलबजावणी करण्याची चर्चा सुरू असतानाच वरळी पॅटर्नचा पुरता फज्जा उडालेला दिसत आहे. वरळी, प्रभादेवीचा परिसर असलेल्या जी/ दक्षिण विभागातील करोना रुग्णांची एकूण संख्या १९०५वर पोहोचली असून या ठिकाणी आतापर्यंत ८३३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

वरळीत करोना रुग्ण सापडल्यानंतर त्या ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण करण्यास सुरुवात केली होती. ९ एप्रिल रोजी वरळी, प्रभादेवीच्या जी/दक्षिण विभागात १३३ रुग्ण होते. २७ मे पर्यंत म्हणजे अवघ्या दीड महिन्यात ही संख्या १९०५वर गेली आहे. मुंबईतील करोनाच्या टॉप टेन वॉर्डात वरळी सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे वरळीतील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून वरळी अद्यापही पूर्णपणे करोनामुक्त झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

anews Banner

Leave A Comment