Home युवा मराठा विशेष अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द!

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द!

95
0

🛑 मोठी बातमी 🛑
अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द!
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :- राज्यातील कोरोनाची वाढती संख्या पाहून पावसाळयाच्या काळात धोका नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आता अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय समितीने हा निर्णय घेतला आहे. मागच्या सत्रातील सरासरी मूल्यमापनावरून ५०% गुण देऊन मूल्यांकन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना ग्रेड दिले जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ग्रेड मान्य नाहीत अशा विद्यार्थ्यांना अपग्रेडेशनची परीक्षा देता येणार आहे. या परीक्षेनंतर ग्रेडपेक्षा जास्त गुण मिळाले तर ते गुण ग्राह्य धरले जातील.

कोरोनामुळे राज्यातील सुमारे ४० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
तसेच अंतिम वर्षातील १० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येणार होती. दरम्यान या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा १६ ते ३१ मे मध्ये घेण्याचेही नियोजन होते. पण वाढत्या रुग्णसंख्येमुळे परीक्षा अद्याप सुरु झालेल्या नाहीत. तितक्यात पाऊसही सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठाने परीक्षा घेता येणार नाहीत असे सांगितले आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव यांच्यासोबत इतर जिल्ह्यातही संसर्ग वाढत असल्याने १३ पैकी ११ विद्यापीठाच्या कुलगुरूंनी परीक्षा घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे सांगितले आहे.

हल्लीच रुग्णसंख्येत वाढ होऊन राज्यातील जास्त रुग्णसंख्येच्या यादीमधील १० जिल्ह्यांमध्ये आलेला सोलापूर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस आणि क्रांतीजोती सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांनी या परीक्षा घेता येतील असे सांगितले आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील १३ कुलगुरूंशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा केली होती. पुणे व सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ऑनलाईन परीक्षा घेता येईल असे सांगितले आहे. तसे सर्वेक्षण आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व चर्चेनंतर उदय सामंत यांनी राज्यस्तरीय समितीला अहवाल देण्यास सांगितले असून आता ३१ मे पर्यंत ते अहवाल देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Previous articleवरळी पॅटर्न फेल?; करोना रुग्णांची संख्या दोन हजाराच्या घरात!
Next articleस्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन सदैव प्रेरणादायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here