• Home
  • 🛑 **विलगीकरणातील व्यक्तींना घरबसल्या मिळणार कोरोनाविषयी वैद्यकीय सल्ला !** 🛑

🛑 **विलगीकरणातील व्यक्तींना घरबसल्या मिळणार कोरोनाविषयी वैद्यकीय सल्ला !** 🛑

🛑 **विलगीकरणातील व्यक्तींना घरबसल्या मिळणार कोरोनाविषयी वैद्यकीय सल्ला !** 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕सौम्य लक्षणे असलेल्या करोनाबाधित व्यक्तींचे मार्गदर्शक सूचनांनुसार गृह विलगीकरण करून त्यांना घरीच उपचार देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. या व्यक्तींना आरोग्यविषयक कोणतीही शंका असल्यास किंवा वैद्यकीय सल्ला हवा असल्यास ते आता तज्ञ डॉक्टरांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधून शकतात. पुणे स्मार्ट सिटीने रुग्णालय व्यवस्थापन एकात्मिक प्रणाली अंतर्गत ‘पुणे टेलिमेडिसीन- आरोग्य धीर’ हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. पथदर्शी उपक्रमाचे आज माझ्या हस्ते सुरवात करण्यात आली.

याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते धीरज घाटे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अग्रवाल, व इतर मान्यवर उपस्थित होते.

https://tinyurl.com/y4hahkue या लिंकवर जाऊन किंवा क्यूआर कोड स्कॅन करून पुणेकर नागरिकांनी प्ले स्टोअरमधून ‘पुणे टेलिमेडिसीन- आरोग्य धीर’ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. यामध्ये थेट डॉक्टरांशी संवाद साधता येणार आहे. तसेच, संवाद साधल्यानंतर आपल्या सर्व वैद्यकीय नोंदी, डॉक्टरांची टिप्पणी व अहवाल अ‍ॅपवर एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे. करोनाबाधित प्रत्यक्ष बाहेर जावे लागू नये यासाठी एक प्रकारे दृकश्राव्य स्वरुपातील ही व्हिडिओ ओपीडी सुविधा उपलब्ध झाली आहे. शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) पाळून नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे अॅपमुळे आरोग्य सुविधेत भर पडणार असून, शहरातील करोनाच्या संकटाला तोंड देताना, तसेच संसर्ग रोखण्यासाठी हे मोबाईल अ‍ॅप साह्यभूत ठरणार आहे.

anews Banner

Leave A Comment