Home नाशिक देवळा पंचायत समिती सहा गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला

देवळा पंचायत समिती सहा गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला

190

आशाताई बच्छाव

Screenshot_20220728-160834_Google.jpg

(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा:- देवळा तालुक्यातील पंचायत समितीच्या सहा गणांच्या आरक्षणाची सोडत येथील तहसील कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नर्सेकर, तहसीलदार विजय सूर्यवंशी, नायब तहसीलदार विजय बनसोडे, गटविकास अधिकारी देशमुख यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. जनता विद्यालय रामेश्वर या शाळेतील ७ वी इयत्तेत शिकणाऱ्या पवन अनिल कांबळे या विद्यार्थ्याच्या हातून चिट्ठी काढत आरक्षण सोडत काढली यात तालुक्यातील पंचायत समिती गणनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
लोहोणेर गण-सर्वसाधारण पुरुष
खालप गण -अनुसूचित जमाती महिला
मेशी गण-अनुसूचित जाती महिला
उमराणे गण -सर्वसाधारण महिला
वाखारी गण- सर्वसाधारण महिला
खर्डे गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग .
यावेळी युवानेते संभाजी आहेर,जिल्हा परिषद सदस्या नूतन आहेर ,शिवसेना तालुकाप्रमुख बापू जाधव,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिरसाठ, प्रहारचे कृष्णा जाधव,पंचायत समितीचे माजी उपसभापती धर्मा देवरे,प्रवीण मेधने,चंद्रकांत आहेर आदिंसह विविध पक्षांचे नेते,कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

Previous articleऔरंगाबाद बसला संभाजीनगरचा बँनर लावून मनसेचे आगळे वेगळे उपक्रम
Next articleपी.एम.एल.ए.कायद्याला मंजुरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.