Home Breaking News 🛑 **महाराष्ट्र ते केरळ, चार राज्यांतून प्रवास करत 1 वर्षाने पोहोचला ट्रक**🛑

🛑 **महाराष्ट्र ते केरळ, चार राज्यांतून प्रवास करत 1 वर्षाने पोहोचला ट्रक**🛑

439
0

🛑 **महाराष्ट्र ते केरळ, चार राज्यांतून प्रवास करत 1 वर्षाने पोहोचला ट्रक**🛑
✍️विशेष बातमी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

तिरुवनंतपुरम /⭕ सोशल मीडियावर सध्या एका ट्रकचा फोटो व्हायरल होत आहे. 38 चाकं असलेल्या या ट्रकमध्ये 78 टनाचं एअरोस्पेस क्षैतिज ऑटोक्लेव आहे. 78 टन वजन घेऊन हा ट्रक महाराष्ट्रातून गेल्यावर्षी निघाला होता.

तो केरळमध्ये 19 जुलैला पोहोचला. तिरुवनंतरपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये 4 राज्यांमधून 1700 किमी प्रवास करत पोहोचणार आहे. एएनआय न्यूज एजन्सीने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. ट्रकचे फोटोही पोस्ट करण्यता आले आहेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, तिरुवनंतपुरम इथं असलेल्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात डिलिव्हरी देण्यासाठी एक एअरोस्पेस क्षैतिज ऑटोक्लेव्ह घेऊन महाराष्ट्रातून एक ट्रक गेल्या वर्षी 9 जुलै 2019 ला निघाला होता. तो ट्रक वर्षभराने तिरुवनंतरपुरम इथं पोहोचणार आहे. कर्मचाऱ्यांनीसुद्धा अशी माहिती दिली की, जुलै 2019 मध्ये सुरु झालेला प्रवास 4 राज्यांमधून आज केरळमध्ये पोहचेल अशी आशा आहे.
तब्बल 78 टन वजन घेऊन जाणाऱ्या ट्रकची सुरक्षाही महत्वाची होती. तसंच वाटेत येणाऱ्या अडचणी पार करत इतर वाहतुकीला अडथळा येणार नाही याचीही काळजी घ्यावी लागत होती. सुरक्षेच्या दृष्टीने ट्रकसोबत एक पोलिस गाडीही असायची. फक्त हा ट्रक कोणत्याही अडचणींशिवाय पोहोचावा यासाठी ज्या मार्गाने जाणार होता त्या रस्त्याची दुरुस्तीही करण्यात आली. रस्त्यात आडव्या येणाऱ्या झाडांच्या फांद्या, वीजेचे खांब हटवण्यात आले होते. विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या मशिनचे पार्ट वेगळे करता येत नाहीत. यासाठी मशिन मोठ्या ट्रकमधून आणण्याचा निर्णय घेतला गेला. दरम्यान, इतकं वजन घेऊन 1700 किमी प्रवास आणि एक वर्षाचा काळ याबद्दल लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत….⭕

Previous article🛑 ” रवा नारळ बर्फी ” कशी बनवावी…! वाचा आणि बनवा 🛑 ✍️ खवय्ये
Next article🛑 **२२, जुलै रोजी शरद पवारांसह नवनियुक्त राज्यसभा खासदारांचा शपथविधी** 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here