• Home
  • 🛑 ” रवा नारळ बर्फी ” कशी बनवावी…! वाचा आणि बनवा 🛑 ✍️ खवय्ये

🛑 ” रवा नारळ बर्फी ” कशी बनवावी…! वाचा आणि बनवा 🛑 ✍️ खवय्ये

🛑 ” रवा नारळ बर्फी ” कशी बनवावी…! वाचा आणि बनवा 🛑
✍️ खवय्ये ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पाककृती:⭕’युवा मराठा न्युज’ आपल्या भेटीला नेहमीच नवनवीन आणि चविष्ट पदार्थ घेऊन येत असतो. आजही आम्ही ‘रवा नारळ बर्फी’ सारखा एकदम भन्नाट पदार्थ आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत… याची रेसिपी एकदम सोपी आहे. नक्कीच वाचा आणि ट्राय करा.

साहित्य घ्या मंडळीहो.

१) 500 ग्रॅम रवा
२) 500 ग्रॅम साखर
३) 1 नारळ
४) 250 ग्रॅम तुप
५) 1 टी स्पून वेलची पावडर
हे साहित्य घेतले असेल तर करा की सुरुवात बनवायला.

१) खोबरे प्रथम भाजून कोरडे करून घ्या. रवा तूप गरम करून भाजून घेतला एकत्र करून घ्या.

२) साखर भिजेल इतके पाणी घालून पाक तयार करून घ्यावा. पाक तयार करताना वाटीत पाणी घेऊन पाक टाकून बघा तळाशी गेल्यावर गोळी तयार झाली की पाक तयार झाला असे समजा. पाक उतरवून थोडे चमचा भर दुध टाका, पाक कधी बिघडणार नाही.

३) गॅस बंद करून रवा मिश्रण एकजीव करून ढवळा घट्ट होत जाते घट्ट झाले की ताटाला तूप लावून त्यावर मिश्रण ओता. थापून त्याच्या वड्या पाडा.

४) १ तास बाजूला ठेवून द्या.

बर्फी खाण्यासाठी तय्यार आहे..⭕

anews Banner

Leave A Comment