Home बुलढाणा पिक विमाच्या रक्कम पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ लाभ द्या! संग्रामपूर तालुका...

पिक विमाच्या रक्कम पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ लाभ द्या! संग्रामपूर तालुका शिवसेना किसान सेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20221128-WA0034.jpg

पिक विमाच्या रक्कम पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ लाभ द्या!

संग्रामपूर तालुका शिवसेना किसान सेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

संग्रामपूर तालुका विशेष प्रतिनिधी (ज्ञानेश्वर पाटील दांदळे)

संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ए आय सी कंपनीकडून आपल्या शेतातील पिकांचा पीक विमा काढलेला आहे व या विमा कंपनीकडून पिक विम्याचे पैसेही काही शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले आहेत मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पिक विमा काढल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पर्यंतही पिक विमा रकमेचे पैसे आलेले नाहीत त्यामुळे पिक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम द्या तसेच पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तोकडे पैसे मिळालेले आहेत व काही शेतकऱ्यांनी पिक विमा काढला मात्र त्यांना अद्याप पर्यंत ही पीक विमा चे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे तात्काळ पिक विमा काढलेल्या सर्वच शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम द्या या मागणणीसाठी शिवसेना किसान सेनेचे तालुकाप्रमुख अमोल ठाकरे यांनी तालुका कृषी अधिकारी यांना 28 नोव्हेंबर रोजी निवेदन दिले आहे
सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना जी विमा रक्कम मिळालेली आहे ती अत्यंत तोकडी आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पिक विमा काढल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पर्यंतही पिक विमा रक्कमेचे पैसे आलेले नाहीत तसेच पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तोकडी रक्कम मिळालेली आहे. त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे .त्यामुळे पिक विम्याच्या रकमेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम द्या तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नुकसान झालेल्या पिकांचे फोटो विमा कंपनीचे साईडवर अपलोड केले त्या शेतकऱ्यांनाही विमा रक्कम (क्लेम) मिळालेला नाही तर काही शेतकऱ्यांना प्रीमियम पेक्षाही विमा रक्कम कमी मिळालेली आहे तसेच नुकसान झालेल्या पिकांचे फोटो अपलोड करीत असताना विमा कंपनीच्या साईडवर काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान झालेल्या पिकांचे फोटो अपलोड करता आले नाही त्यामुळे विमा कंपनीने अशा शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम (लाभ) दिलेला नाही त्यामुळे विमा काढल्यानंतरही बरेचसे शेतकरी पिक विम्याच्या रकमेपासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळे तात्काळ विमा रकमेच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ पिक विम्याची रक्कम द्या ,अन्यथा आम्ही संग्रामपूर तालुक्यातील शिवसैनिक लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा या निवेदनातून देण्यात आलेला आहे या निवेदनावर किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे , शुभम घाटे शहर प्रमुख, विजय मारोडे उप तालुकाप्रमुख, राहुल मेटांगे, शिवाजी अढाव , धनंजय आवचार, बाबुराव जाधव ,नितीन भिसे ,सुनील मुकुंद, रवींद्र मारोडे विशाल बांगर, शेख अब्दुल शेख लुकमान, पुंडलिक खानझोड अमोल देशमुख आदी शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत.

Previous articleई पास मशीन कायमस्वरूपी शासनास परत करण्याची संग्रामपूर तालुका सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी..
Next articleस्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाची अवैद्य रेती माफीयांवर कार्यवाही!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here