• Home
  • स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाची अवैद्य रेती माफीयांवर कार्यवाही!

स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाची अवैद्य रेती माफीयांवर कार्यवाही!

आशाताई बच्छाव

IMG-20221128-WA0037.jpg

स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाची अवैद्य रेती माफीयांवर कार्यवाही!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

बुलढाणा जिल्ह्यात अवैद्य रेती उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असून याकडे संबंधित महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे सुद्धा हितसंबंध रेती तस्करांसोबत असल्याचे स्पष्ट होत असून.
मात्र या रेतीमाफीयांचे मुचक्या आवरलण्यास स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा कडून सुरुवात झाली असून त्यांच्याकडून होत असलेली कार्यवाही दिसून येत आहे. बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड, तसेच बी बी महामुनी अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा, व अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांचे आदेशाने आज दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे पथक पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहितीनुसार अवैध्य रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती मिळताच मोठ्या सिताफिने स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकातील स. फौ. गजानन माळी, पो हे कॉ.राजेंद्र अंभोरे, पो कॉ. अमोल शेजोळ यांनी ६ ब्रास अवैद्य वाळू वाहतूक करणारे विना नंबर टिप्पर पकडून एका आरोपीवर गुन्हा दाखल करून वाहन जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा कडून होत असलेल्या जिल्हाभर रेती माफियांवरील कार्यवाहीमुळे रेतीमाफीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . विशेष म्हणजे संग्रामपूर तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी रेतीमाफीयांवर एक दोन कारवाई केल्यानंतर मात्र रेती माफियांसोबत एका रेती तस्करी करणाऱ्या दलाला मार्फत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुद्धा बऱ्यापैकी रेती तस्करांसोबत “चिरीमिरी” सुरू झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे .

anews Banner

Leave A Comment