• Home
  • रत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा

रत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा

आशाताई बच्छाव

Screenshot_20220603-192246_Facebook-removebg-preview.png

रत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आणि डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कर्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीची डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी जाहीर केली आहे.

संघटनेला बळकटी मिळण्याच्या दृष्टीनं 4 उपाध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये एबीपी माझाचे रिपोर्टर अमोल मोरे, लोकशाहीचे प्रतिनिधी आणि प्रगती टाइम्सचे लक्ष्मीकांत घोणसे पाटील, सकाळचे शेखर जोशी आणि आपले कोकणचे गोकुळ कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्याचे सचिव म्हणून मुझम्मिल काझी तर सहसचिव म्हणून समीर शिगवण काम पाहणार आहेत. प्रसिद्धी प्रमुखपदाची जबाबदारी पुढारीचे दीपक शिंगण पार पडणार आहेत. कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्योती बिवलकर (पब्लिक ॲप), प्रशांत हरचेकर (प्रहार), प्रणित शेट्ये (कोकण टुडे), अजित सुर्वे (दिव्य कोकण), कृष्णकांत साळगावकर (टीव्ही ९), सुनील धावडे (युवा मराठा न्यूज) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा मराठी परिषदेचे माजी अध्यक्ष हेमंत वणजू सल्लागार म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

डिजिटल मीडियामध्ये काम करताना येणाऱ्या अडचणींना मात देण्याच्या दृष्टीनं संघटना काम करणार आहे. डिजिटल माध्यमाच्या प्रतिनिधींना राजमान्यता मिळवून देण्यासाठीही संघटनेचा लढा राहणार आहे. डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्येनं डिजिटल मीडिया परिषदेचे सभासदत्व घ्यावं, असं आवाहन जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी केलं आहे.

anews Banner

Leave A Comment