Home नांदेड स्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20221127-WA0025.jpg

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.
मुखेड प्रतीनीधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ, मुक्रमाबाद द्वारा संचलित… स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान प्रतीचे पूजन तसेच संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन करून ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक इनामदार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ रामकृष्ण बदने , प्राचार्य मुकुंदराज जाधव ,रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. ढोकाडे रविकुमार, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. गायकवाड मा.म. संतोष पाटील,बजरंग मुळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here