Home विदर्भ शिक्षक, शिक्षकेतरांना कोविड प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस द्यावा ! माध्य.उच्च माध्य. शिक्षक,...

शिक्षक, शिक्षकेतरांना कोविड प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस द्यावा ! माध्य.उच्च माध्य. शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समितीची मागणी

241
0

राजेंद्र पाटील राऊत

शिक्षक, शिक्षकेतरांना कोविड प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस द्यावा !
माध्य.उच्च माध्य. शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समितीची मागणी
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ  युवा मराठा न्युज नेटवर्क)- :जिल्हयातील प्राथमिक,माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सुध्दा फ्रंटलाईन वर्कर समजून कोविड प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस देण्यात यावा अशी मागणी वाशिम जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
वाशिम जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने आज (दि. ४) जिल्हाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, व जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या राज्यभर कोरोनाची तिसरी लाट शिखरावर पोहोचली आहे. या परिस्थितीत राज्यातील नववी ते बारावी व महाविद्यालयीन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच फेब्रुवारी महिन्यापासून दहावी व बारावीच्या तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा व लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय अभिनंदनीय असून; माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने या निर्णयाचे समर्थन करण्यात आले आहे.
तथापि शाळा महाविद्यालय सुरु झाल्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यात थेट संपर्क होणार आहे. यासोबतच शासनाने सक्ती केल्यामुळे शिक्षक व कर्मचारी Rt-pcr चाचणी करीत आहेत. या चाचणीमध्ये अनेक शिक्षक व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांपासून किंवा शिक्षकांना विद्यार्थ्यांपासून कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. अनेक शिक्षक व कर्मचारी सहव्याधी ग्रस्त असल्याने, त्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
या परिस्थितीचा विचार करता व अनेक शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी यापूर्वी कोरोना काळात ‘फ्रंटलाईन वर्कर’ म्हणून कोरोना विषयक कामे केली असल्याचा विचार करून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनासुद्धा फ्रंटलाईन वर्कर समजून कोरोना प्रतिबंधक लसीचा (तिसरा डोस) बूस्टर डोस देणे आवश्यक आहे. सध्या वाशीम जिल्ह्यात ६० वर्षावरील प्रोढ व्यक्तींसह आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांना फ्रंटलाईन वर्कर समजून कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस देण्यात येत आहे. याच प्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनासुद्धा फ्रंटलाईन वर्कर समजून कोरोना प्रतीबंधक लसीचा (तिसरा डोस) बूस्टर डोस देण्यासंदर्भात योग्य ती शिफारस व कार्यवाही करावी अशी मागणी माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

बुस्टर डोस साठी सकारात्मक शिफारस करू ! – उपशिक्षणाधिकारी डाबेराव*
जिल्ह्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर प्रमाणे काम केल्याचे मान्य करीत तसेच आगामी परीक्षेच्या काळाचा विचार करता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस देण्याची मागणी योग्य आहे, त्यामुळे यासंदर्भात शिक्षण विभागामार्फत वरिष्ठांकडे सकारात्मक शिफारस करण्यात येईल असे आश्वासन यावेळी उप शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला दिले. या मागणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक काळबांडे यांनी सुध्दा शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

Previous articleराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले राजमाता जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन
Next articleहाळणीत तन्जिम-ए-इंसाफची शाखा कार्यकारणी जाहीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here