Home विदर्भ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले राजमाता जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले राजमाता जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन

118
0

राजेंद्र पाटील राऊत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले राजमाता जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन
(ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा ) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज 4 फेब्रुवारी रोजी सिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव राजवाडामधील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळाला भेट दिली. तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांचे समवेत पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष ॲड नाझेर काझी, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, वंशज शिवाजीराजे जाधव, नागपूर येथील पुरातत्व संचालनालयाच्या सहायक संचालक जया वहाने, उपविभागीय अधिकारी भूषण अहीरे, तहसिलदार सुनील सावंत आदी अन्य मान्यवर उपस्थित होते.

राजवाड्याच्या दरवाजापासून ते आतील सर्व भागाची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाहणी केली. दरवाजावर असलेले वैशिष्ट्य पूर्ण नारळाचे दगडी तोरण, दरवाजाच्या आतील नगारखाना, तसेच आतील विविध भाग त्यांनी पाहिले व माहिती जाणून घेतली. राजमाता जन्मस्थळी जाऊन त्यांनी दर्शन घेतले.

मंदाकिनी खंडारे या महिला गाईडने त्यांना राजवाडाविषयी सर्व माहिती दिली. त्याबद्दल राज्यपालांनी तिचे कौतुक केले व अभिप्राय पुस्तकात नोंदही केली. या ठिकाणी वंशज श्री. जाधव कुटूंबियांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन मी स्वतःला धन्य समजतो. मी या भूमीला नमन करतो.

या ठिकाणचा सर्वांगीण विकास व्हावा, असे पालकमंत्री डॉ शिंगणे यांना सांगितले. या ठिकाणी देश विदेशातून पर्यटक येऊन येथील अर्थचक्राला गती येईल, अशा पद्धतीने विकासाचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here