• Home
  • राज्यातील सहाय्यक पुलिस निरीक्षकांना मिळणार लवकरच खुश खबर – ६०० सहाय्यक पोलिस निरीक्षक होणार निरीक्षक

राज्यातील सहाय्यक पुलिस निरीक्षकांना मिळणार लवकरच खुश खबर – ६०० सहाय्यक पोलिस निरीक्षक होणार निरीक्षक

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210209-WA0096.jpg

राज्यातील सहाय्यक पुलिस निरीक्षकांना मिळणार लवकरच खुश खबर – ६०० सहाय्यक पोलिस निरीक्षक होणार निरीक्षक

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

नागपूर, दि.९. सद्यःस्थितीत राज्याच्या पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे.
त्याला कारणही तसेच आहे.
राज्य पोलिस दलातील जवळपास सहाशेवर सहायक पोलिस निरीक्षकांना लवकरच गुड न्यूज मिळणार आहे.
येत्या आठवड्याभरात त्यांना पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे.
गेल्या वर्षभरापासून हे अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य पोलिस दलातील बदल्या आणि पदोन्नत्यांमध्ये अनियमितता होती.
त्यामुळे राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षक ते उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता.
गेल्या वर्षभरापासून सहायक पोलिस निरीक्षक पदोन्नतीच्या कक्षेत होते.
मात्र, गृहमंत्रालय आणि पोलिस महासंचालक कार्यालयात योग्य समन्वय नव्हता.
त्यामुळे पदोन्नतीचा प्रश्‍न रखडला होता.
पोलिस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाचे अधिकारी मन मारून काम करीत होते.
कालबद्ध पदोन्नतीची वाट पाहत अनेक अधिकारी दिवस काढत होते.
याचा परिणाम तपास, बंदोबस्त आणि पोलिस ठाण्यातील दैनंदिन कामकाजावरही पडत होता.
शेवटी डी.जी. कार्यालयाने पोलिस अधिकाऱ्यांची मनःस्थिती लक्षात घेत पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला.
गेल्या चार फेब्रुवारीपर्यंत सहायक पोलिस निरीक्षकांना संवर्ग मागण्यात आला होता.
ही प्रक्रिया पार पडल्यानंतर आस्थापना विभागाने नुकतीच पदोन्नतीची यादी तयार केली असून त्यामध्ये ६०० पेक्षा जास्त ए.पी.आय. दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे.
आठवड्या भरात पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्‍नती देण्यात येणार आहे.
या यादीची प्रतीक्षा ए.पी.आय. दर्जाचे अधिकारी करीत असून अनेकांनी क्रिम पोस्टींगसाठी सेटिंग लावणे सुरू केले आहे.
अनेकांनी ठाणेदारी मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
तसेच काहींनी फक्त मुंबई किंवा पुणे या शहरांसाठी तयारी केली असल्याची माहिती मिळाली आहे.

anews Banner

Leave A Comment