Home नांदेड मुखेड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करा – शंकरअण्णा वडेवार..

मुखेड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करा – शंकरअण्णा वडेवार..

103
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करा – शंकरअण्णा वडेवार..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुंद्राळा येथील जलाशयात मागील काळी दुष्काळी परिस्थितीत अपुऱ्या पाणी साठ्यामुळे मुखेड शहराला ४ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मुखेड नगरपालिका प्रशासनाने घेतला होता.
परंतू आजघडीला मुखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्यां कु्द्राळा जलाशयात मुबलक प्रमाणात पाणीसाठा आसताना मुखेड नगरपालिका प्रशासनाने शहराला ४ दिवसाआड पाणीपुरवठा करूण शहरात कृत्रिम
पाणी टंचाई निर्माण करुन शहरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती करित आहेत.
यामुळे शहरातील
नागरिकांसाठी खालील म्हणी प्रमाणे
भरुन धरण उश्याला..।
कोरड पडली घश्याला..।।
अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे शहारातील पाणीपुरवठा सुरळीत करुन नियमितपणे १ दिवसाआड पाणीपुरवठा चालु करण्यात यावा जागोजागी पाण्याच्या टाक्या बसविण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी मुखेड प्रहारचे तालुका अध्यक्ष मा.शंकरअण्णा वडेवार यांच्या नेतृत्वाखाली मुखेड नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले आणी शहरात पाणीपुरवठा सुरळीत नाही झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगरपालिका कार्यालयावर तिव्र निदर्शने अंदोलन करण्यात येतील अशा इशाराही देण्यात आला.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बोईनवाड,प्रहार
दिव्यांग आघाडीचे शहर अध्यक्ष
संजय कांबळे,प्रहार शहर उपाध्यक्ष
सय्यद अस्लम,प्रहार युवा शहर उपाध्यक्ष
बळीराम गेडेवाड,
प्रहार दिव्यांग आघाडी शहर उपाध्यक्ष मुकेश भालेराव,प्रहार दिव्यांग आघाडी सचीव शंकर डोंगरे, प्रहार दिव्यांग आघाडी कोषाध्यक्ष परवेझ कंधारी , अक्षय रिंदकवाले,हिरा चौधरी, मारोती दंडलवाड यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleशिलाबाई मुरलीधरराव बोने वय 55 वर्षे यांचे दुःखद निधन
Next articleराज्यातील सहाय्यक पुलिस निरीक्षकांना मिळणार लवकरच खुश खबर – ६०० सहाय्यक पोलिस निरीक्षक होणार निरीक्षक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here