• Home
  • 🛑 ५६ व्या वर्षी एकनाथ शिंदेंचं पदवी परीक्षेत घवघवीत यश, वडिलांचे गुण पाहून मुलगा भारावला 🛑

🛑 ५६ व्या वर्षी एकनाथ शिंदेंचं पदवी परीक्षेत घवघवीत यश, वडिलांचे गुण पाहून मुलगा भारावला 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201121-WA0044.jpg

🛑 ५६ व्या वर्षी एकनाथ शिंदेंचं पदवी परीक्षेत घवघवीत यश, वडिलांचे गुण पाहून मुलगा भारावला 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕”प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे किंवा प्रयत्नांती परमेश्वर या म्हणींचा प्रत्यय मला घरातच पाहायला मिळतो…”

शिक्षणाला वयाची अट नसते असं म्हटलं जातं, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही वयाच्या 56 व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन हे वाक्य खरं करुन दाखवलं आहे. नुकताच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला. शिंदे यांनी पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे.

पदवी परीक्षेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी भावूक ट्विट केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत 77.25 टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत. वयाच्या 56व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असण्याची शक्यता आहे…⭕

anews Banner

Leave A Comment