• Home
  • 🛑 ” महाआवास अभियान अंतर्गत ” १०० दिवसात ८.८२ लाख घरे बांधणार 🛑

🛑 ” महाआवास अभियान अंतर्गत ” १०० दिवसात ८.८२ लाख घरे बांधणार 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201121-WA0043.jpg

  1. 🛑 ” महाआवास अभियान अंतर्गत ” १०० दिवसात ८.८२ लाख घरे बांधणार 🛑
    ✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ राज्यात आजपासून महाआवास अभियान ग्रामीण भागात सुरू करण्यात आले असून त्या अंतर्गत २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत म्हणजे केवळ १०० दिवसात ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले बांधण्यात येतील, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत सांगितले.

सध्या अपूर्ण असलेली घरे पूर्ण करणे आणि नवीन घरे बांधणे या दोन्हींचा अभियानात समावेश असेल. केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदीम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, ग्रामीण भागातील शासकीय जागांवरिल निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठीची योजना यांमधून ग्रामीण नागरीकांना घरे देण्यात येत आहेत.

शासनामार्फत ग्रामीण घरकुल योजनांतर्गत सर्वसाधारण क्षेत्राकरिता १ लाख २० हजार रुपये व डोंगराळ, नक्षलग्रस्त क्षेत्राकरिता १ लाख ३० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. या व्यतिरिक्त मनरेगाअंतर्गत ९० दिवसांची अकुशल मंजूरी १८ हजार रुपये तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधकामाकरिता १२ हजार रुपये अनुदान असे एकूण अनुक्रमे १.५० लाख व १.६० लाख रुपये अर्थसहाय्य घरकुल बांधकामासाठी देण्यात येते. यातून किमान २६९ चौरस फूट आकाराचे घर बांधले जाते. तसेच स्वत:ची जागा नसलेल्यांना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते.

लाभार्थ्यांना दर्जेदार घर बांधता यावे म्हणून नियमित अनुदानाव्यतिरिक्त बँकेमार्फत ७० हजारांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले….⭕

anews Banner

Leave A Comment